सण असो किंवा आयुष्यातले कोणतेही स्पेशल क्षण.. अशा वेळी ‘एक सेल्फी तो बनता है!’ सेल्फीशिवाय हे सेलिब्रेशन पूर्ण तरी कसं होणार? तेव्हा हल्ली सेल्फीची क्रेझ एवढी वाढलीये की काही विचारायची सोय नाही. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या सेल्फीचं वेड लागलंय. खास क्षण असले आणि अशा प्रसंगी सेल्फी घेण्याचा मोह एखाद्याला झाला नाही तरच नवल! आता जमाना सेल्फीचा आहे आणि यात देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीसुद्धा मागे नाहीत. एका छोट्या मुलाकडून नुकतेच त्यांनी चक्क सेल्फी काढण्याचे धडे घेतले.
वाचा : प्लॅस्टिक पिशव्या बाळगल्यास होऊ शकतो २४ लाखांहून अधिक दंड
प्रणव मुखर्जी यांनी लहान मुलासोबतचा आपला सेल्फी ट्विटरवर शेअर केला. ‘लहान मुलांना भेटणं हे नेहमीच आनंददायी असतं. आज मी एका लहान मुलाकडून सेल्फी काढायला शिकलो’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. हमझा सैफी या मुलानं प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली आणि यावेळी त्यानं मुखर्जींना सेल्फी काढायला शिकवलं. अनेकदा सेलिब्रिटीपासून ते नेतेमंडळींपर्यंत प्रत्येकजण हमखास सेल्फी काढताना दिसतो. पण प्रणव मुखर्जी मात्र या सगळ्यापासून बऱ्यापैकी लांबच राहणं पसंत करत होते. पण यावेळी मात्र छोट्या मुलासोबत सेल्फी काढण्याचा मोह त्यांनाही अनावर झाला असंच दिसतंय.
It is always a pleasure to meet children.
Seen here with young visitor Hamza Saifi who taught me how to take a #selfie#CitizenMukherjee pic.twitter.com/GPQ4mvpPdj— Pranab Mukherjee Legacy Foundation- PMLF (@CitiznMukherjee) August 31, 2017