Premanand Maharaj Health Update : आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. त्यांचे लाखो फॉलवर्स आहेत. प्रेमानंद महाराज यांचे दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. प्रेमानंद महाराज हे आपल्या भक्ताच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरानंतर अनेकदा जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं.
दरम्यान, प्रेमानंद महाराज हे आजारी असल्यामुळे पदयात्रा करत नाहीत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा मेसेज मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रेमानंद महाराज यांच्या तब्येतीबाबत प्रश्न विचारले जात आहेत. सुजलेले डोळे, लाल चेहरा, कापणारा आवाज, पण तरीही त्यांनी आपली सेवा सोडली नाही, प्रेमानंद महाराजांची प्रकृती बिघडली अशा स्वरुपाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, या व्हिडीओवर आता हित राधा केळी कुंज आश्रमाने स्पष्टीकरण दिलं आहे.
आश्रमाने काय स्पष्टीकरण दिलं?
आश्रमाने म्हटलं की, “तुम्हा सर्वांना कळविण्यात येतं आहे की पूज्य गुरुदेव श्री हित प्रेमानंद महाराज यांची प्रकृती ठीक आहे. गुरुदेव नेहमीप्रमाणे त्यांचे दैनंदिन काम करत आहेत. मात्र, फक्त मॉर्निंग वॉक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या खोट्या आणि निराधार अफवांकेड लक्ष देऊ नका आणि अशा अफवा पसरवू नका”, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.
राधे राधे ! श्री हरिवंश !
— Bhajan Marg (@RadhaKeliKunj) October 8, 2025
सूचना
आप सभी को अवगत कराया जाता है कि पूज्य गुरुदेव श्री हित प्रेमानन्द गोविंद शरण जी महाराज का स्वास्थ्य ठीक है। गुरुदेव पूर्ववत अपनी दैनिक दिनचर्या में ही स्थित हैं। केवल प्रातः कालीन पदयात्रा को अनिश्चित काल के लिए स्थगित किया गया है।
इसलिए आप सभी से… pic.twitter.com/jwoB2gt3g0
प्रेमानंद महाराज काय म्हणाले?
दरम्यान, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये प्रेमानंद महाराज हे भक्तांशी संवाद साधताना आपण पूर्णपणे स्वस्थ असून तुमच्याबरोबर संवाद साधत असल्याचं म्हटलं आहे. व्हायरल व्हिडीओवर एका भक्ताने प्रेमानंद महाराज यांना सांगितलं की, काही लोकांनी तुम्ही रुग्णालयात असल्याच्या अफवा पसरवल्या आहेत, यावर प्रतिक्रिया देताना प्रेमानंद महाराजांनी म्हटलं की, “मी पूर्णपणे ठीक असून आता तुमच्या सर्वांच्यासमोर बसलो आहे.”