Auto running from wrong side of Hadpasar Bridge Video :पुण्यात कधी काय घडेल याचा नेम नाही. पुणे आणि पुणेकर चर्चा जगभरात होत असते. पुणेकरांचे विविध किस्से रोज ऐकायला मिळतात. कधी पुणेरी पाटी चर्चेत येते तर कधी पुणेरी काका चर्चेत येतात. पुणेरी पाटी इतकीच पुण्यातील रिक्षावाल्यांची चर्चा होत असते. कधी पुण्यातील अतंरगी रिक्षांची चर्चा होते तर कधी पुणेरी रिक्षाचालकांची. काही दिवसांपू्र्वीच पुण्यातील अतरंगी रिक्षाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा पुण्यातील रिक्षाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ कौतुकास्पद नसून निंदणीय आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये हडपसर येथील पुलावरील आहे जिथे एक रिक्षा पुलावरून चुकीच्या बाजूने आणि उलट दिशेने धावताना दिसत आहे. सर्व वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करून ही उलट दिशेने धावत आहे. रिक्षाचालकाला स्वत:च्या किंवा इतरांच्या जीवनाची काहीही पर्वा नाही. धक्कादायक बाब म्हणजे रिक्षामध्ये प्रवासी बसलेले दिसत आहे. रिक्षाचालकाने प्रवाशांचा जीवही धोक्यात घातला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले आहे.
व्हायरल व्हिडीओ avi_not_for_you नावाच्या पेजवर व्हायरल होत आहे. व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी रोष व्यक्त केला. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “काही दिवसांनी मेट्रोच्या पुलावर रिक्षा चालवाना दिसतील हे लोक, खतरनाक विषय आहे त्यांचा”
दुसऱ्याने लिहिले,”अशा एका मूर्ख रिक्षाचालकांच्या चूकीमुळे जनता सर्व रिक्षा स्टँडला दोष देतात”
पुणेकर रिक्षाचालक नेहमीच चर्चेत
पुण्यातील रिक्षा चर्चेत ये्ण्याची ही पहिलीच वेळ नाही. मार्चच्या अखेरीस लागू झालेल्या नवीन नियमानुसार, उबर ॲपवर प्रदर्शित होणारे भाडे केवळ अंदाजे भाडे सूचवणारा आकडा असेल आणि प्रवाशांना प्रत्यक्षात किती रक्कम द्यावी लागेल हे मीटर रीडिंगवर आधारित असेल.या धोरणामुळे उबेर वापरकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. १ एप्रिलपासून, अॅपवर दाखवले जाणारे भाडे हे अंदाजे भाडे असेल आणि अंतिम भाडे मीटर रीडिंगद्वारे निश्चित केले जाईल. पुण्यातील उबर रिक्षाचालक आणि स्थानिक रिक्षावाल्यांमध्ये वाद झाला होता. एका स्थानिक रिक्षाचालकाने महिला प्रवासी आणि उबेर रिक्षाचालकाला धमकावल्याचा प्रकार समोर आला होता त्यानंतर काही स्थानिक रिक्षाचालकांनी उबेर रिक्षाचालकाला धमकावल्याचा व्हिडीओ समोर आला होता.