Funny car Video: ट्रकच्या मागे लिहिलेली अनेक मजेशीर वाक्ये तुम्ही पाहिली असतील. देशभरातील लोक मजेदार कोट्स लिहिण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या मागे लिहिलेल्या ओळी सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियावर एका मजेशीर ओळीमुळे ट्रक नव्हे तर कार चर्चेचा विषय बनली आहे. भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका पुण्यातील कारच्या मागे लिहलेला संदेश सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. .

ही कार पुण्यातील नवले ब्रीजवरुन जात असताना हा व्हिडीओ काढला आहे. पुण्यातील नवले ब्रीज हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. इथे दर दिवसाला अपघात होत असतात, नवले ब्रीजवरुन गाडी चालवणं म्हणजे एक चॅलेंजच आहे असं म्हणायला हरकत नाही. अशातच एका गाडी चालवायला शिकवणाऱ्या कंपनीने आपल्या कारच्या मागे असं काही लिहलंय की तुम्हीही म्हणाल बरोबर आहे भाऊ. तुम्हाला माहितीच असेल अनेकदा कार चालवायला शिकवणाऱ्या कारच्या मागे ड्रायव्हर शिकत आहे असे लिहलेलं असतं. जेणेकरुन आजूबाजूची वाहने सावध होऊन गाडी चालवू शकतील. मात्र या गाडीच्या मागे काय लिहलंय पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कारच्या मागे, “इथे शिकाल तर कुठेही टिकाल #नवले ब्रीज” असं लिहलं आहे. म्हणजेच हा नवले ब्रीज इतका खतरनाक आहे की एकदा का तुम्ही या ब्रीजवर गाडी चालवायला शिकला की मग तुम्हीही कुठेही गाडी चालवू शकता.

पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. पूर्वी ट्रक किंवा मालवाहू जड वाहनांच्या मागे लिहिलेला संदेश अनेकांचे लक्ष खेचून घेत असे. अनेकदा सुविचारांसह सामाजिक जागृती करण्याचे काम या संदेशातून केले जात असे. हा ट्रेंड हळूहळू चारचाकी वाहनांपर्यंत आला.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा कोट्ससह कार ऑनलाइन व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सोशल मीडियावर अशा फनी कोट्समुळे अनेक वाहने लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहेत.