पुणे : पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून टोळक्यांची दहशत वाढली आहे. दरम्यान बुधवारी(ता. ५) मध्यरात्री बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड घडल्याचे उघडकीस आले आहे. या टोळक्यांनी जवळपास ५० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केली. गाड्यांच्या काचा फोडल्या ज्यामुळे रहिवाशांमध्ये दहशती निर्माण झाली होती. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान विनाकारण वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांनीआरोपींची धिंड काढली आहे.

अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात मध्यरात्री आलेल्या टोळक्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी, टेम्पो, रिक्षांची दांडक्याने तोडफोड केली. टोळक्याने शिवीगाळ करुन दहशत माजविली. वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केला. टोळके तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास पदकाच्या अधिकारी, रात्रीच्या गस्तीचे अधिकारी आणि क्राइम ब्रांचचे अधिकारी त्या ठिकणी पोहचले आणि घटनास्थळाची पाहणी केली. २५ वाहनांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी केली आहे. तिन्ही आरोपींना पुणे ग्रामीण मधील वेल्हा तालुक्यातील पाबे गावातून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसांपूर्वी बिबवेवाडीत वैमनस्यातून सराइतावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. माधाव वाघाटे खून प्रकरणात बदला घेण्यासाठी जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडलेल्या सराइतावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.