Pune Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. पुणे दर्शनाला दर दिवशी हजारो लोक येतात. पुण्यातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले बघण्यास लोक गर्दी करतात. पुणे शहरात जसे अनेक ठिकाणे आहेत तसे पुण्याबाहेर किंवा पुण्याजवळ सुद्धा अनेक ठिकाणे आहेत ज्याविषयी अनेकांना माहिती नाही. आज आपण एका लेणीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्याजवळील एका लेणीविषयी माहिती सांगितली आहे. आज आपण त्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. (pune video do you see these caves from 55 km away from pune watch viral video of bhaje leni)

हेही वाचा : Noida Viral Video : वृद्ध व्यक्तीकडे दुर्लक्ष करणं भोवलं… १६ कर्मचार्‍यांना मिळाली उभं राहण्याची शिक्षा; Video एकदा पाहाच

पुण्याजवळची सुंदर लेणी

p

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुंदर लेणी दिसेल. या लेणीचे नाव भाजे लेणी आहे. भाजे लेणी हे जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर असून पुण्यापासून फक्त ५५ किमीवर आहे. येथे प्राचीन बौद्ध लेणी आहे. हा एक लेण्यांचा समुह आहे. जेथे तुम्हाला असंख्य खडक दिसतील. येथे चैत्यगृह व २१ विहार आहे. दरदिवशी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये या लेण्याचे सुंदर दृश्य दाखवले आहे. व्हिडीओतील लेण्यांची रचना व परिसर पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि तुम्हाला एकदा तरी येथे भेट द्यावी असे वाटेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “गेला आहात का पुण्याजवळील ह्या लेणी ला? भाजे लेणी फक्त पुण्यापासून दोन तासांवर” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : नवरा म्हणून अपयशी ठरला! बाईकवरुन नवरा-बायको खाली पडले मात्र शिक्षा त्यानं बायकोला दिली; VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

wagholi_kharadi_vimannagar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही गेला आहात का येथे?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भाजे लेणी, लोणावळा” तर एका युजरने लिहिलेय, “लोणावळाला आहे खूप छान आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “लय भारी आहे” काही युजर्सनी या वर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.