Pune Video : सध्या महाराष्ट्रात अनेक शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे मुंबईत तर पावसाने कहर केला आहे. गेल्या दोन तीन दिवसामध्ये पुण्यात पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. अशात सोशल मीडियावर पुण्यातील पावसाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक जण त्यांचे अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करताना दिसत आहे.

पाऊस म्हटलं की घराबाहेर कसं पडावं, हा सर्वात मोठा प्रश्न असतो पण नोकरी आणि शिक्षणासाठी तारेवरची कसरत करत पावसात बाहेर पडावं लागतं. अशा परिस्थितीत ये जा करण्यासाठी महानगरपालिकेच्या बसेस अधिक उपयोगी ठरतात पण तुम्ही कधी वॉटर बस पाहिली आहे का? जर नाही, तर हा व्हिडीओ पाहा.

या व्हिडीओत तुम्हाला रस्त्यावरील पाणी थेट बसमध्ये शिरताना दिसेल. पुण्यात एवढा पाऊस आहे की थेट चालत्या बसमध्ये पाणी शिरताना दिसते. हे दृश्य इतके भयानक आहे की पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईन.

हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील पीएमटी बसमधील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भर पावसात रस्त्यावर खूप जास्त पाणी साचलेले असताना सुद्धा बस धावताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत दिसते की रस्त्यावरील पाणी थेट बसमध्ये शिरत आहे. हा व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी कोणाच्या अंगावर काटा येईल. विशेष म्हणजे बसमध्ये प्रवासी सुद्धा बसलेले दिसत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “कशी आहे वॉटर बस? हे फक्त हिंजवडी आणि पुण्यातच होऊ शकते” ही बस हिंजवडी मार्गावरील असल्याची शक्यता आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

hinjawadi_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे फक्त हिंजवडी आणि पुण्यातच शक्य आहे…बस नाही आली तरी वॉटर बस आली!
पावसात ट्रॅफिकपेक्षा पोहून ऑफिस गाठणं सोपं!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरी आहे ही परिस्थिती” तर एका युजरने लिहिलेय, “हे खूप भयानक आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हिंजवडी वॉटर पार्क फ्री एन्ट्री” एक युजर तर टोमणा मारत लिहितो, “स्मार्ट सिटी” तर एक युजर लिहितो, “अशा परिस्थितीत पुणेकरांनी सतर्क राहावे”