Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे. या शहराला प्राचीन वारसा लाभला आहे. येथील ऐतिहासिक वास्तू बघण्यासाठी दुरवरून लोक येतात. पुण्यात आल्यानंतर तुम्ही शनिवारवाडा, लाल महाल अनेकदा पाहिले असेल पण तुम्ही कधी महादजी शिंदे यांची छत्री बघितली आहे का? पुण्यातील वानवडी येथे असलेली ही शिंदे छत्री अतिशय आकर्षक असून पर्यटकांचे लोकप्रिय ठिकाण आहे. सध्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये या मंदिराविषयी सांगितले आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्हाला या महादजी शिंदे छत्री मंदिर दिसेल. व्हिडीओत या मंदिराचा परिसर रेकॉर्ड करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रवेश शुल्कापासून मंदिराच्या बाहेरील आणि आतील चित्रफीत दाखवले आहे. या वास्तूचा बाहेरचा भाग अँग्लो-राजस्थानी शैलीमधील पिवळ्या वाळूच्या दगडात पूर्ण करण्यात आलाय. या वास्तूमध्ये एक आयताकृती सभामंडप आहे. मुख्य मंदिराच्या आतील भागात महादजी शिंदे यांचा पुतळा आहे
मंदिराचा परिसर पाहून तुम्हालाही या ठिकाणी एकदा तरी भेट द्यावी, असे वाटेल.pixbygupta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

याशिवाय लोकसत्ताने गोष्ट पुण्याची या मालिकेत या खास मंदिराविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. भारतात अनेक संस्थानं होती त्यात अनेक घराणे होती. त्यापैकीच एक महत्वाचं घराणं म्हणजे ग्वाल्हेरचे शिंदे. पुण्याच्या वानवडी येथे याच शिंद्यांची ही शिंदे छत्री आहे. ही शिंदे छत्री महादजीं शिंदे छत्री मंदिर म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा : VIDEO : चिमुकलीने कृष्णाच्या भजनावर केले नृत्य, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “याला म्हणतात संस्कार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महादजी शिंदे कोण होते?

तुम्हाला प्रश्न पडला असेल की महादजी शिंदे कोण होते? महादजी शिंदे हे मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमी सेनानी होते. इंग्रज त्यांना मानाने ‘द् ग्रेट मराठा’ असे म्हणायचे. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुढे नेण्याचं काम केलं त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठा सैनिकांनी काही लढायांमध्ये ब्रिटिशांचा निर्णायक पराभव केला आणि इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले.