Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी ही लहान मुले मजा मस्ती करताना दिसून येतात तर कधी डान्स करताना दिसून येतात. तुम्ही लहान मुलांना ट्रेंडिग गाण्यावर किंवा चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना अनेकदा पाहिले असेल पण सध्या एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली कृष्णाच्या भजनावर नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या चिमुकलीने अप्रतिम नृत्य सादर केले आहे.

चिमुकलीने भजनावर केले नृत्य

हा व्हायरल व्हिडीओ एका धार्मिक कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये तु्म्हाल भजन गीत गात असल्याचा आवाज येत असेल. ‘मोहन में तो पागल हो गई’ या भजन गीतावर ही चिमुकली सुंदर नृत्य करत आहे. कृष्णाच्या भजनावर ती अप्रतिम नृत्य करताना दिसत आहे. तिचे नृत्य सादरीकरण पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ती मनसोक्तपणे नृत्य करताना दिसत आहे. काही लोकांना या चिमुकलीचा व्हिडीओ पाहून बालपणीची आठवण येईल. सत्संगमध्ये नृत्य करणाऱ्या या चिमुकलीने सर्वांना वेड लावले. सध्या हा व्हिडीओ चांगला व्हायरल होत आहे.

When Indian young woman wears saree and takes over streets of Japan
Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते, तेव्हा.. पाहा व्हायरल व्हिडीओ
a man beating innocent dog in a moving lift
VIDEO : बापरे! लिफ्टमध्ये कुत्र्याला अमानुषपणे मारहाण, सीसीटिव्ही फुटेज व्हायरल; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
dance video
आयुष्य एकदाच मिळतं, फक्त मनभरून जगता आलं पाहिजे! वयाच्या नव्वदीत आजीने केला भन्नाट डान्स, ऊर्जा पाहून व्हाल थक्क
loksatta analysis telangana police closure report claim rohit vemula was not a dalit
विश्लेषण : रोहित वेमुला दलित नव्हता? तेलंगणा पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधील दाव्याने खळबळ का उडाली?
what is hallucinations
तरुणाला आजूबाजूला दिसते करीना; मानसोपचार तज्ज्ञांकडून जाणून घ्या, नेमका हा प्रकार काय?
Sreesanth lied about sanju samson to Rahul Dravid Video
VIDEO: संजू सॅमसनचं आयुष्य बदलून टाकणारं श्रीशांतचं ते वाक्य
viral ukhana video
VIDEO : “…पण क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाने उखाण्यातून पत्नीला स्पष्टच सांगितले, व्हिडीओ होतोय व्हायरल
pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल

पाहा हा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Video : लुंगी शर्टवर तरुणांनी केला झकास डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल

narwalparmila_jaglan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जवळपास पाच लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. एका युजरने लिहिलेय, “चांगले आहे. आजी बरोबर सत्संगला जात असल्यामुळे मुलांवर खूप चांगले संस्कार होतात.” तर एका युजरने लिहिलेय,”ही खूप चांगली गोष्ट आहे की या चिमुकलीला आतापासून सत्संगमध्ये घेऊन जात आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती गोड आहे मुलगी… याला म्हणतात संस्कार” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.