पंजाबमधील एका व्यापाऱ्याची एका माणसाने ‘सर्वाधिक मागणी असलेला काळा घोडा’ विकून तब्बल २२.६५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील कापड व्यापारी रमेश सिंग यांनी हा घोडा विकत घेतला. जेव्हा त्यांनी हा घोडा धुतला तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण हा घोडा वास्तवात काळा नव्हताच. त्याला फक्त काळा रंग देण्यात आला होता. त्याचा खरा रंग तपकिरी होता. यानंतर रमेश यांना खात्री पटली की त्यांना काळ्या मारवाडी घोड्याऐवजी देशी घोडा विकण्यात आला आहे.

सिंग यांनी स्टड फार्ममध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही फसवणूक उघडकीस आली. लेहार कलान गावातील लछरा खान नावाच्या व्यक्तीने रमेश यांना सांगितले की त्याचे मित्र त्यांना घोडा विकत घेण्यात मदत करू शकतात आणि त्याने रमेश यांची जितेंदर पाल सेखॉन आणि लखविंदर सिंग यांच्याशी ओळख करून दिली.

VIDEO: RRR चित्रपटाची क्रेझ; मुलांनी चित्रपटगृहातच केली नाचायला सुरुवात; जबरदस्त डान्स पाहून नेटकरीही झाले खुश

रमेश सिंग यांना वाटले की ते मारवाड प्रांतातील, आपल्या धीटपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या, एका दुर्मिळ प्रजातीच्या घोड्यासाठी जवळपास २३ लाख रुपये गुंतवणार आहे. घोडा खरेदी केल्याने ५ लाख रुपयांचा नफा होऊ शकतो, असा विश्वासही त्यांना दिला गेला. रिपोर्ट्सनुसार, सिंग म्हणाले की त्यांनी फसवणूक करणाऱ्यांना ७.६ लाख रुपये रोख दिले आणि उर्वरित रकमेसाठी दोन चेक दिले.

तथापि, घोडा मिळाल्यानंतर त्यांनी त्याला अंधोळ घातली. तेव्हा त्याचा खरा रंग बघून पंजाबच्या या व्यापाऱ्याला धक्काच बसला. फिकट तपकिरी रंगाच्या कोटवरून असे दिसून आले की त्यांचा घोडा देसी घोडा असून त्यांना सांगण्यात आलेली ही दुर्मिळ जात नव्हती.

Sachin Tendulkar Birthday : सचिन तेंडुलकर पाकिस्तानसाठी भारताविरुद्ध मैदानात उतरला होता! नेमकं असं काय घडलं होतं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पोलिसांनी आता तिन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनंतर, असे समजले की या तिघांनी त्याच पद्धतीचा वापर करून इतरांनाही फसवले होते.