Python Attack Farmer: एक शेतकरी आपल्या शेतात काम करत होता, तेव्हा तो अचानक गायब झाला. आजूबाजूच्या लोकांना काहीतरी अयोग्य वाटलं कारण त्याची बाईक तिथेच उभी होती. संध्याकाळ झाली तरी तो दिसला नाही, म्हणून गावकरी त्याला शोधायला बाहेर पडले.

शेतकऱ्याला शोधताना त्यांना जवळच्या एका झोपडीतून विचित्र आवाज आला. त्यांनी झोपडीत डोकावून पाहिलं आणि ते पाहून थरकापच उडाला. कारण तिथे २६ फूट मोठा अजगर होता जो आवाज करत होता आणि त्याचं पोट खूप फुगलेलं होतं. गावकऱ्यांना काहीतरी गडबड वाटली आणि त्यांना समजलं की नेमकं काय घडलं आहे. ही घटना इंडोनेशियामधील मजापहित गावातील आहे.

खरं तर, इंडोनेशिया आणि फिलिपीन्सच्या जंगलात अनेकदा २० फूटांपेक्षा मोठे अजगर आढळतात. हे अजगर सहसा प्राण्यांची शिकार करतात, पण कधी कधी माणसंही त्याच्या तावडीत सापडतात.

शेतकऱ्याबरोबर नेमकं काय घडलं… (Python Swallows Farmer)

जनसत्ताच्या वृत्तानुसार नुकत्याच घडलेल्या या थरारक घटनेत ६३ वर्षांचा एक शेतकरी आपल्या शेतात काम करत गेला होता, पण रात्री उशिरा तो परत आला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि गावकरी मिळून त्याला शोधायला निघाले.रात्रीपर्यंत तो घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्या गायब होण्याची माहिती दिली आणि गावकऱ्यांनी शोध सुरू केला. गावकऱ्यांना शेताजवळ त्याची बाईक उभी दिसली. बाईकजवळच एक झोपडी होती. लोक तिथे गेले आणि पाहिलं तर तिथे एक अजगर होता आणि त्याचं पोट खूप फुगलेलं होतं. त्यामुळे लोकांना संशय आला की अजगराने काहीतरी मोठं गिळलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजगराचं फुगलेलं पोट कापलं, तर… (Python Attack Farmer)

अंतारा वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, जेव्हा अजगराचं पोट कापलं गेलं, तेव्हा सगळे लोक थक्क झाले कारण शेतकऱ्याचं शव पोटात तसंच होतं. शरीरावर कुठेही खरचटलेलं नव्हतं, अजगराने शेतकऱ्याला जिवंत गिळलं होतं. गावकऱ्यांनी त्याचं शव बाहेर काढलं आणि घरी पोहोचवलं. या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.