Rahul Gandhi Ice Cream Video Viral: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यात आली आहे. देशाच्या दक्षिणेकडील टोकापासून सुरू झालेल्या या खडतर पायी पदयात्रेत राहुल गांधींनी ३,५०० किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक लोकप्रिय यूट्यूब चॅनेलशी संवाद साधला. राजस्थानमधील असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधींनी कर्ली टेल्सच्या कामिया जानीशी बोलताना आपल्या खाजगी आयुष्याविषयी गप्पा मारल्या. एवढंच नव्हे तर राहुल यांनी आपल्या आईस्क्रीम प्रेमावरही भरभरून भाष्य केलं. गप्पांमध्येच राहुल गांधींनी चक्क चार आईस्क्रीमचे कप फस्त केले.

कामियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली आहे ज्यामध्ये राहुल व ती स्वतः आईस्क्रीम खात आहेत. एवढ्यात कामियाला एक कॉल येतो आणि जेवढ्या वेळात ती परत येते तोपर्यंत राहुल यांनी चक्क चार आईस्क्रीम कप फस्त केलेले असतात. आइस्क्रीमच्या रिकाम्या कपकडे बघून राहुल गांधी स्वतः आपला व्हायरल डायलॉग ‘खतम, टाटा, बाय बाय अलविदा’. असं म्हणतात. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बघता बघता राहुल गांधींनी फस्त केले ४ आईस्क्रीम

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी राहुल गांधींच्या कूलनेसचं कौतुक केलं आहे. यावेळी पुन्हा एकदा राहुल यांचा टीशर्ट आणि स्लीपर असा लुक पाहायला मिळाला. दरम्यान, आता पुढे राहुल गांधी ३० जानेवारी रोजी ‘भारत जोडो यात्रे’च्या समारोपाच्या वेळी श्रीनगरमधील पक्षाच्या मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकावतील.

हे ही वाचा<< धीरेंद्र कृष्ण महाराजांची ‘चमत्कारिक चिठ्ठी’ आहे तरी काय? माईंड रीडरचा थक्क करणारा Video होतोय Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्या माहितीनुसार,७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे सुरू झालेली भारत जोडो यात्रा ३, ९७० किमी, १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा प्रवास केल्यानंतर ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये समाप्त होईल.