मोदींनी काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर देशातील जनता सध्या बँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लावताना दिसत आहे. बँकेच्या बाहेर त्रासलेल्या चेहऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी स्वत: एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएमच्या बाहेर लागलेल्या रांगेमध्ये उभे राहुन पैसे काढले. दिल्लीतील एका एटीएममध्ये राहुल गांधी यांनी पैसे काढण्यासाठी लावलेली हजेरी पाहुन त्यांना पाहण्यासाठी अगोदर असणाऱ्या गर्दीमध्ये आणखीनच भर पडली. दरम्यान राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये जनतेची समस्या जाणून घेण्यासाठी रांगेतून पैसे काढण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले होते.

[jwplayer Dva75psx]

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयावर हटके पद्धतीने निषेध नोंदविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींनी पैसे काढण्यासाठी केलेल्या मेहनतीवर नेटीझन्सनी पाणी फेरले आहे. राहुल गांधी यांनी रांगेत उभे राहुन पैसे मिळविण्यासाठी थांबण्याच्या प्रकारावर नेटेझन्सकडून विनोदी प्रतिक्रिया उमटल्याचे दिसते.  काही नेटीझन्सन राहुल गांधी यांना एटीएम मशिनने काय प्रतिक्रिया दिली असेल, याची कल्पना देखील केली आहे.राहुल गांधी यांनी आपले एटीएम कार्ड मशिनमध्ये घातल्यानंतर तुम्ही जो पिन नंबर वापरत आहात तो पुन्हा एकदा तपासून पहा, असे उत्तर आले असेल अशी कल्पना एका नेटीझन्सने दिली आहे.

[jwplayer FDiHtI1T]

तर एटीएमबाहेर जमलेल्या तुफान गर्दीचा आपल्या राजकीय प्रचार रॅलीसाठी फायदा होईल, या हेतुने राहुल गांधी यांनी एटीएममध्ये हजेरी लावल्याचे मत एका नेटीझन्सने व्यक्त केले आहे. एका नेटीझन्सने तर राहुल गांधील यांची तुलना दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांशी केली आहे. राहुल गांधी हे अरविंद केजरीवाल यांच्याशी स्पर्धा करत आहेत. राहुल यांच्यानंतर केजरीवाल आता नागीन डान्स करतील, अशी मजेशीर ट्विटरवर पाहायला मिळते आहे.

Story img Loader