Rahul Gandhi On Pics Of Sonia Gandhi with Noorie : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. जी आता खूप चर्चेत आली आहे. यावेळी त्यांच्या पोस्टचा विषय राजकारणापेक्षा वेगळा असा आहे. राहुल गांधी वैयक्तिक पोस्ट फार कमी शेअर करतात; पण आता त्यांनी त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्याबरोबरचा एक सुंदर क्षण शेअर केला आहे. त्यामध्ये सोनिया गांधी या घरातील नव्या सदस्याबरोबर दिसत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, राहुल गांधींच्या घरात आता नवा सदस्य कोण आला बरं! काळजी नको, हा नवा सदस्य दुसरा-तिसरा कोणी नसून, त्यांची लाडकी श्वान आहे.

राहुल गांधी यांनी पोस्ट केलेल्या फोटोत सोनिया गांधी याच लाडक्या कुत्रीला खांद्यावर बांधताना दिसत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये राहुल गांधी यांनी लिहिले की, तुम्हाला माहिती आहे, नूरी माझ्या आईची लाडकी आहे.

नूरी कोण आहे?

गेल्या वर्षी जागतिक प्राणी दिनानिमित्त राहुल गांधींनी त्यांची आई सोनिया गांधी यांना जॅक रसेल टेरियर जातीची नूरी नावाची कुत्री भेट म्हणून दिली होती. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी जागतिक प्राणी दिनानिमित्त राहुल गांधी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘नूरीला भेटा- आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य!’

हेही वाचा- शिखर धवनकडे आहेत ‘या’ शानदार चार महागड्या कार; किंमत ऐकून व्हाल थक्क

राहुल गांधी यांनी हे पिल्लू उत्तर गोव्यातील मापुसा येथून आणले होते. तेव्हापासून ते कुटुंबातील एक प्रेमळ सहकारी बनले आहे. व्हिडीओमध्ये सोनिया गांधीदेखील नूरीबरोबर आनंदाने खेळताना दिसत आहेत. सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच जेव्हा नूरीला पाहिले तेव्हा त्यांना किती आनंद झाला हे या व्हिडिओमधून दिसत आहे. यावेळी त्यांनी “ती किती गोंडस आहे” असे उद्गार काढले.

राहुल गांधींनी नूरीला गोव्यातील मापुसामधून आणले घरी

राहुल गांधींनी नूरीबरोबर शेअर केलेल्या फोटोंना सोशल मीडियावरही खूप पसंती मिळत आहे. त्यावर अनेकांनी राजकारणाव्यतिरिक्त हा आजचा सुंदर फोटो असल्याचे म्हटले आहे. या पोस्टवर आता लाखो लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींच्या कुटुंबातील श्वान चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांचा ‘पॅडी’ नावाचा कुत्राही चर्चेत आला होता. ‘नूरी’बद्दल असे म्हटले जाते की, ती जॅक रसेल टेरियर जातीची आहे.