सोशल मीडियावर रेल्वेशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियाची क्रेझ तरुणाईच्या डोक्यात घुसली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. यासाठी अनेक वेळा लोक आपला जीवदेखील धोक्यात घालतात. अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात सोशल मीडियामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये रील बनवताना एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तुम्हाला माहितीये का की, तुम्ही प्रत्येक ठिकाणी सेल्फी किंवा रिल्स बनवू शकत नाही. अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे रिल्स बनवण्याला आणि सेल्फी काढण्यास बंदी आहे. यामध्ये रेल्वेस्थानक आणि रेल्वे लाइनचाही समावेश आहे. रेल्वेच्या नियमांनुसार, या दोन्ही ठिकाणांवर परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करणे एक गुन्हा आहे. यामुळे पुढच्या वेळी रेल्वेस्थानकावर गेलात तर स्थानकावर सेल्फी घेणे आणि रिल्स बनवणे टाळा. नाहीतर धोका होऊ शकतो, हे समोर आलेल्या व्हिडीओत नक्की पाहा…

रेल्वेकडून लोकांना ट्रॅकपासून अंतर राखण्याच्या सूचना दिल्या जातात. अनेक लोकांवर कारवाईदेखील केली जाते, कारण असं करणं कायद्याने गुन्हा आहे. पण, तरीही लोक असा सगळा प्रकार करत असतात. तसंच या व्हायरल व्हिडीओतील तरुणीनेदेखील केलं. नेमकं घडलं तरी काय, जाणून घेऊया…

(हे ही वाचा: Video: दोन गरुडाची शिकारीसाठी हवेत झटापट; ‘त्या’ झेपेची रंगली चर्चा, व्हिडिओचा शेवट चुकूनही चुकवू नका)

समोर आलेले प्रकरण मेक्सिकोतील हिडाल्गो येथील आहे. इथे अनेक लोक रेल्वे रुळावर ट्रेनची वाट पाहत उभे होते. लोकांना या ट्रेनसोबत सेल्फी आणि व्हिडिओ बनवायचे होते, त्यामुळेच लोक ट्रॅकच्या अगदी जवळ उभे होते; पण त्यांच्या आनंदाचे रूपांतर शोकात होणार आहे हे क्वचितच कुणाला माहीत होते. थोड्या वेळातच वेगात ट्रेन आली त्यातच एक मुलगी आपला फोन पकडून व्हिडिओ बनवत होती. व्हिडिओ बनविण्याच्या नादात ती अगदी रुळाजवळ पोहोचली अन् तिला रेल्वेने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, ती धडकन खाली पडली अन् उठलीच नाही.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तिचा एक मित्र तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे, पण मुलगी बेशुद्ध किंवा मृत आहे. या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही ट्रेन पाहण्यासाठी लोकांची इतकी गर्दी का जमली होती आणि सर्व व्हिडिओ फोटो का काढीत होते, याचे कारण म्हणजे, ही ट्रेन वाफेच्या इंजिनवर धावते आणि कॅनडाहून मेक्सिको सिटीला जाते; ज्याला पाहण्यासाठीच लोक जमतात. त्यासाठी तरुणीही आनंदी होती. पण थोड्याच वेळात त्या तरुणीला तिचा जीव गमवावा लागला. पाहा खाली घटनेचा लाईव्ह थरार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडिओ

मुलीच्या मृत्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्स व्हिडीओवरून धडा घेण्याचे बोलत आहेत. रील बनवताना आपण आपल्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. थोडासा निष्काळजीपणा जीव घेऊ शकतो, याची अनेक उदाहरणे आतापर्यंत समोर आली आहेत.