Railway crossing accident video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला. एका तरुणाने खरंच यमराजाला चकवा दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नशीब असावं तर असं.

अनेक प्रवासी पूल चढण्याचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात; पण अशा आततायी कृतीद्वारे अनेक जण अपघाताला आमंत्रण देतात; तर अनेक जण जीवानिशीही जातात. अशा बातम्या ऐकून वा प्रत्यक्ष तशा दुर्घटना बघूनही काही जण सिग्नल सुरू असतानाही थेट वाहने रुळांवरून नेताना दिसतात. मात्र, हे किती धोकादायक आणि जीवावर बेतू शकते हे या व्हिडीओतून पाहायला मिळाले आहे.

हा व्हिडीओ रेल्वे क्रॉसिंगचा आहे. तेथून ट्रेन जाणार असते म्हणून लोक आणि गाड्यांना तेथे थांबवण्यात आले आहे. परंतु, असे असतानाही काही लोक तेथे न थांबता, रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी घाई करून आपला जीव धोक्यात घालण्यापेक्षा कधीही थोडा वेळ थांबलेले बरे ठरते. मात्र, या ट्रक चालकानं रुळावर ट्रक नेला आणि तेवढ्यात विजेच्या वेगानं एक्सप्रेस आली. आता पुढे काय झालं असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. त्या संपूर्ण ट्रकचा अक्षरश: चुरा झाला.मात्र या तरुणाचं नशीब इतकं बलवत्तर होतं की एवढ्या मोठ्या अपघातातूनही तो जिवंत बाहेर आला. त्याचा साधं खरचटलेलंही दिसत नाहीये. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अवघ्या ५ सेकंदात तो मृत्यूच्या दारातून परत आला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: पुणेकरांचा नाद करायचा नाय! पेट्रोल पंपावर लिहली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही म्हणाल “जशास तसं”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल, तर स्वत:ला आवरा आणि थांबा. कारण- काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्याला हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो. नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत, एकानं म्हंटलंय नशीब बलवत्तर आणखी एकानं “मृत्यू आला पण देव मदतीला आला धावून” अशी प्रतिक्रिया दिली आहे.