मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज ठाण्यात होणाऱ्या सभेला उत्तर प्रदेश, बिहार आणि जम्मू काश्मीरमधून लोक येणार असल्याची माहिती दिलीय. प्रसारमाध्यमांशी बोलताना अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंच्या सभेबद्दल फार उत्सुकता असल्याचं सांगताना आपल्या ओळखीमधील काही लोक थेट विमानाने उत्तर प्रदेशातून या सभेसाठी येणार असल्याचं म्हटलंय. मात्र अविनाश जाधव यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी मराठीच्या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खिल्ली उडवण्यास सुरुवात केलीय. सोशल मीडियावर अशाप्रकारच्या बऱ्याच कमेंट्स दिसून येत आहेत.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: …अन् वसंत मोरे राज ठाकरेंच्या पाया पडले; ‘शिवतीर्थ’वरील बैठकीमधील Inside Photos पाहिलेत का?

जाधव नेमकं काय म्हणाले?
“दोन तारखेच्या सभेनंतर लोकांकडून प्रश्न आले, राष्ट्रवादीकडून प्रश्न आले. त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं काम हे आमचं आहे. जे काही प्रश्न आलेत त्याला राज ठाकरे सभेतून उत्तर देतील,” असं या सभेसंदर्भात बोलताना अविनाश जाधव यांनी म्हटलंय. तसेच पुढे बोलताना त्यांनी या सभेबद्दल सगळीकडेच उत्सुकता असल्याचं सांगितलं. “माझे काही मित्र आहेत. त्यापैकी एका मित्राने मला फोन केलेला. तेव्हा त्याने सांगितले की त्याचे काही उत्तर प्रदेशमधील मित्र आहेत जे विमानाने दुपारी यासभेसाठी येणार आहेत. त्याने मला फक्त सांगितलं की दादा पास ठेवा,” असंही अविनाश जाधव म्हणाले.

पुढे बोलताना, “या सभेबद्दल अशी आतुरता असेल लोकांमध्येसभेसाठी तर तुम्ही समजू शकता की महाराष्ट्राच नव्हे तर युपी, बिहार, काश्मीर सगळीकडूनच लोक येणार आहेत. एवढी मोठी सभा याच्यापुढे घेण्याची ताकद कोणत्या नेत्यात आहे असं मला वाटत नाही. ही ऐतिहासिक सभा असून सर्व ठाणेकरांनी येथे उपस्थित रहावे,” असंही अविनाश जाधव म्हणालेत.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: राज ठाकरे Vs पवार फॅमेली.. १० दिवसांमध्ये कोण काय बोललं? जातीयवाद, २१०० कोटींचा घोटाळा, मोदींबद्दलची भूमिका अन्…

मनसे ट्रोल…
अविनाश जाधव यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन अनेकांनी मनसेला तुमची सुरुवात मराठीच्या मुद्द्यावरुन झाल्याची आठवण करुन दिलीय. तर काहींनी पक्षाच्या नावात महाराष्ट्र असल्याची आठवण करुन दिली आहे.

१) नावात महाराष्ट्र आहे…

२) आता काय बोलावं…

३) ट्रम्प यांनाही बोलवा…

४) सभा की परप्रातींयांसाठीची छटपूजा?

५) कायमचे येणार का?

६) तिकीटाचे पैसे भाजपा देणार का?

७) महाराष्ट्र धर्म सोडला का?

८) हिंदीत भाषण करणार का?

९) पाकिस्तानमधूनही येतील

१०) चंद्र, मंगळावरुनही येतील

११) फटके मारुन परत पाठवलं, विमानाने परत बोलवलं…

१२) मराठी माणूस येणार की नाही?

११) आधी ट्रेनने पाठवलं आता…

१२) असाही टोला

१३) भावा कोणत्या रांगेत आलास

१४) महाराष्ट्रातील लोकांसाठी नाही का सभा?

१५) मतं पडत नाहीत

१६) रिंकिया के पापा ने होणार स्वागत..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजच्या सभेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील पाचपाखाडी भागात ‘मुंबई मे बैठा हिंदूओ का राजा, अपनी हिफाजत चाहिए तो मनसे में आजा’ अशा आशयाचे फलक उभारले आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने आता हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर उडी घेतल्याचं जवळजवळ निश्चित झालंय.