सध्याच्या जमान्यातील प्रेमवीर प्रेयसीसाठी काय करतील याचा नेम नाही. शिवाय मुलीचं प्रेम नसेल तर तीला आपलं प्रेम पटवून देण्यासाठी आणि ते मान्य करायला लावण्यासाठी ते कोणत्या थराला जातील हे सांगता येणं कठिण आहे. पण हे प्रेम करताना ते पटवून देताना आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये निदान याची तरी खबरदारी प्रेमवीरांनी घ्यायला हवी आणि तसं केलं नाही तर त्यांना तुरुंगाची हवा खायला लागू शकते. सध्या अशाच एका प्रेमवीराचं प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये त्याचं प्रेम ज्या मुलीवर होतं तिने त्याच्याशी बोलायचं नाकारत ब्लॉक केल्यामुळे त्याने असा काही दंगा केला आहे की, अखेर पोलिसांना त्याला अटक करावी लागली आहे.

ही विचित्र घटना राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील बडनोर कस्बे येथे घडली आहे. प्रकाश प्रजापती नावाच्या तरुणाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. या दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्यामुळे मुलीने प्रकाशची बोलणं बंद केलं. मात्र, प्रकाश सतत तिच्याजवळ आपल्यासोब बोलण्याचा हट्ट धरु लागला. त्याच्या सतत येणाऱ्या कॉलला कंटाळून मुलीने प्रकाशचा नंबरच ब्लॉक केला.

हेही वाचा- मियां-बीबी राजी तो…, लांबचा मुहूर्त धरला म्हणून पठ्ठ्याने होणाऱ्या बायकोलाच पळवलं

गर्लफ्रेंडने नंबर ब्लॉक केल्यामुळे प्रकाशला काय करायचं हे सुचेनासं झालं आणि रागाच्या भरात तो जवळच्या एका मोबाईल टॉवरवर चढला. टॉवरवर चढल्यानंतर त्याने जोरजोत आरडाओडा करायला सुरुवात केली. शिवाय प्रेयसीला तो मोठमोठ्याने आवाज देवू लागला. त्याच्या या दंग्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने टॉवरखाली गोळा झाले.

या तरुणाच्या दंग्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर तहसीलदार रामजी लाल जाटव, विकास अधिकारी बिहारीलाल शर्मा, सरपंच नरेंद्रसिंग राठोड, सहायक पोलिस उपनिरीक्षक रामलाल हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि प्रकाशला खाली येण्याचा सल्ला देवू लागले. पण काही केल्या तो पोलिसांचे ऐकायला तयार नव्हता, “मला माझ्या प्रेयसीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलणं करुन द्या, तरच मी खाली उतरेन” अशी अट त्याने पोलिसांसमोर घातली.

हेही वाचा- लग्नाच्या वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा; वरमाला घालण्यासाठी नवरी स्टेजवर आली आणि…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर जवळपास दीड तासांनतर पोलिसांना नाईलाजास्तव त्याला त्या मुलीशी व्हिडीओ कॉल करुन द्यावा लागला आणि मग हा तरुण टॉवरवरून खाली उतरला. तो खाली उतरताच पोलिसांनी शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली असून मुलीच्या वडिलांनी देखील तरुणावर मुलीचा छळ केल्याचा आरोप केला आहे.