पाळीव प्राणी असणाऱ्या घरांमध्ये रोज मजेशीर किस्से घडत असतात. ज्याप्रकारे या प्राण्यांना घरातील सदस्य समजुन प्रेम केले जाते त्याचप्रकारे तेदेखील घरातल्यांना जीव लावतात आणि त्यांच्यावर हक्क गाजवताना दिसतात. माणसांप्रमाणे हे प्राणीदेखील रुसून बसतात, चिडतात याचे अनेक गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले आपण पाहतोच. असाच एक अनुभव अभिनेता राम कपूरला आला आहे. या अनुभवाचा इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
अभिनेता राम कपूरने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याचा कुत्रा त्याच्यावर रागात भुंकताना दिसत आहे. पण हा कुत्रा नेमका का चिडला आहे हे दाखवण्यासाठी अभिनेता कॅमेरा फिरवून कुत्र्याच्या चिडण्याचे कारण दाखवतो. तर या कुत्र्याचे चिडण्याचे कारण म्हणजे घरात आणलेले कुत्र्याचे शिल्प आहे. हे शिल्प पाहून आपल्या घरातल्यांनी दुसरा कुत्रा आणला का? या संभ्रमात हा कुत्रा असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो गोंधळलेला दिसत आहे आणि हक्काने तो अभिनेत्यावर रागवत असल्याचे दिसत आहे. या कुत्र्याचे निरागस चिडणे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्की हसू येईल.
आणखी वाचा : एन्ट्री असावी तर अशी! नवी कार घरी आणल्याचा हा व्हिडीओ Viral का होतोय एकदा पाहाच
अभिनेता राम कपूरने शेअर केलेला व्हिडीओ :
या व्हिडीओला आत्तापर्यंत ९६ हजारांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या कुत्र्याच्या भावनांनी नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. अनेक जणांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्याच्या निरागसतेचे कौतुक केले आहे. काही जणांनी ‘दुसरा कुत्रा आणल्यामुळे त्याला विश्वासघात झाल्यासारखे वाटत असेल’ अशा कमेंट्स केल्या आहेत. सध्या अभिनेत्याने शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.