Woman Issues Apology After Controversial Viral Video : काही दिवसांपूर्वी दिल्लीतील रॅपिडो ड्रायव्हरचा खिल्ली उडवणारा आणि बॉडीशेमिंग करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. महिलेने रॅपिडो बुक केली आणि त्यानंतर रॅपिडो ड्रायव्हर तिच्या बिल्डिंगखाली येऊन उभा राहिला. रॅपिडो ड्रायव्हरचे वजन जास्त असल्यामुळे आणि त्याने मागे लावलेल्या बॅगमुळे महिलेला बाईकवर बसायला जागा नसते. त्यामुळे ती राईड रद्द करते आणि बॉडीशेमिंग करत “अरे मी बसू कुठे” म्हणत व्हिडीओ पोस्ट करते.
सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर महिलेने आता इन्स्टाग्रामवर स्पष्टीकरण देत आणखीन एक व्हिडीओ पोस्ट केला आणि ड्रायव्हरची माफी मागितली आहे. माफी मागितली असली तरीही तिचा सूर मात्र आक्रमकच वाटत होता आहे. नवीन व्हिडीओमध्ये तिने पुन्हा सांगितले की, ड्रायव्हर कठोर परिश्रम करतो. तसेच माझे पैसे देखील कठोर परिश्रमातून येतात आणि फुकटात झाडावरून पडत नाहीत. जर ती रॅपिडो राईड बुक करत असेल तर ती स्वतःच्या आरामाला प्राधान्य देईल ; असे मुद्दे तिने व्हिडीओत मांडले आहेत.
माझे पैसे झाडावरून पडत नाहीत… (Viral Video)
रॅपिड ड्रायव्हरचा अपमान करण्याचा तिचा हेतू अजिबात नव्हता. व्हिडीओच्या शेवटी ड्रायव्हरबद्दल केलेली कमेंट चुकीची होती आणि त्यासाठी तिने माफी मागितली. त्यानंतर व्हिडीओ स्क्रिप्टेड किंवा प्रसिद्धीसाठी बनवलेला नाही असे सुद्धा नमूद केले आहे. तसेच ज्यांनी तिच्यावर चुकीचे आरोप केले ते स्वतः व्हिडीओ बनवत होते आणि त्यातून पैसे कमवत होते. “जर तुम्हाला वाटत असेल की मी चुकीचे केले आहे, तर तुम्हीही तेच करत आहात. तुमच्यात आणि माझ्यात काही फरक नाही” ; असे तिने व्हिडीओत म्हंटले आहेत.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “दिल्लीत रॅपिडो ड्रायव्हरची नुकतीच थट्टा करणाऱ्या आणि बॉडीशेमिंग करणाऱ्या महिलेने इन्स्टाग्रामवर स्पष्टीकरण दिले आहे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, “तिने जे काही म्हटले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. पण, रॅपिडो ड्रायव्हरने त्याच्या सेवेबद्दल विचार केला पाहिजे. दोघांनीही बसू शकणाऱ्या सीटबद्दल निश्चितच काही नियम असले पाहिजेत” ; अशी कमेंट केली आहे जी अगदीच योग्य आहे.