मॅकडोनाल्डमध्ये तुम्ही काही खाण्यासाठी गेला आणि तिथे तुम्हाला उंदीर चावला तर? कदाचित तुम्ही अशा प्रसंगाची कधी कल्पनादेखील केली नसेल. पण सध्या अशी घटना समोर आली आहे. ज्यामध्ये मॅकडोनाल्डमध्ये गेलेल्या एका ८ वर्षाच्या मुलाला उंदीर चावला आहे. ही घटना घडताच मुलाच्या पालकांनी मॅकडोनाल्ड्स विरुद्ध तक्रार केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही विचित्र घटना तेलंगणातील कोमपल्ली येथील एसपीजी हॉटेलमधील मॅकडोनाल्डच्या डायनिंगच्या एरियात घडली. टॉयलेटमधून बाहेर आलेला एक उंदीर तिथे बसलेल्या ८ वर्षांच्या मुलाच्या पँटमध्ये घुसला आणि चावला. शिवाय मुलाला उंदीर चावल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- मगरीच्या पिल्लावर हल्ला करायला गेला अन् काही क्षणात डाव पलटला, थरारक घटनेचा Video होतोय Viral

ही घटना घडली तेव्हा त्यावेळी मुलासोबत त्याचे आई-वडील देखील होते. ८ मार्च रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ रेस्टॉरंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुलाला उंदीर चावताच पालकांनी मुलाला बोवनपल्ली रुग्णालयात नेलं आणि त्याला रेबीज आणि टिटॅनसची लस दिली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुलाच्या वडिलांनी रेस्टॉरंट चेन व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार दाखल केली.

हेही पाहा- आईची माया! मुसळधार पावसात आईनं स्वत:च्या पंखांचं केलं छप्पर अन्…

नेमकं काय घडलं ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओमध्ये, एक उंदीर रेस्टॉरंटच्या टॉयलेटमधून बाहेर येताना दिसत आहे. हा उंदीर ज्या टेबलखाली जातो त्या टेबलवर ८ वर्षाचा मुलगा त्याच्या आई-वडिलांबरोबर बसला होता. उंदीर दिसताच मुलाच्या वडीलांनी त्याला घालवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उंदीर मुलाच्या पॅंटमध्ये घुसतो आणि त्याच्या डाव्या पायाला चावतो. मुलाच्या डाव्या पायाला दोन जखमा झाल्याचं सांगित पालकांनी पोलिसांत तक्रार देखील केली आहे. दरम्यान, पुढील तीन दिवसांत त्या मुलाला रेबीजच्या लसीचे आणखी दोन डोस देण्यात आले. वडिलांनी सांगितले की रेस्टॉरंटचे कर्मचारी निष्काळजी होते, कारण त्यांनी उंदीरांला थांबण्यासाठी काहीही केलं नाही.