मांजर आणि उंदराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मांजर आणि उंदराचे व्हायरल होणारे व्हिडीओ म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात आधी ‘टॉम अँड जेरी’ कार्टुन येतं. उंदीर आणि मांजर यांच्यातील शत्रुत्व आपण या कार्टुनमध्ये पाहतो. यात जेरी नावाचा उंदीर टॉम या मांजराला अक्षरश: जेरीस आणतो. मात्र कार्टुन आणि प्रत्यक्षात बराच फरक असतो हे आपल्याला माहिती आहे. आपण घरात अनेकदा पाहिलं असेल मांजर उंदराच्या मागे पळताना दिसते. पण या उलट टॉम अँड जेरी कार्टुनमधील दृश्य तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला यावर विश्वास ठेवावा लागेल.

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये एक उंदीर मांजरीला धैर्याने तोंड देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक उंदीर मांजरीच्या मागे धावत त्याला पळवून लावताना दिसत आहे. जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मांजर भीतीने इकडे तिकडे धावताना दिसते. मांजरा जेव्हा कचऱ्याच्या डब्ब्यामागे लपते. तेव्हा उंदीर तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पण मांजर त्याच्या मागे लागते. तेव्हा पुन्हा एकदा धैर्याने मांजरीचा पाठलाग करत तिला पिटाळून लावतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्यक्षातील टॉम अँड जेरीचं शत्रुत्व पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही. हा व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून लाइक्सचा वर्षाव सुरु आहे. तसेच व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्स देखील देत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, ‘हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मला टॉम अँड जेरी कार्टुनची आठवण झाली’, तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ‘शेवटी प्रत्यक्षातले टॉम अँड जेरी पाहायला मिळाले’