Rawalpindi Chicken tikka masal muridke meetha pan AIF air force day dinner menu viral photo : भारतीय हवाई दलाच्या ९३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या डिनरचा मेन्यू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची सर्वत्र चर्चा केली जात आहे, पण ही चर्चा अन्न पदार्थांमुळे नाही, तर त्यांच्या नावांमध्ये वापरण्यात आलेल्या खास संदर्भांमुळे ही चर्चा होत आहे. सोशल मीडियावर बुधवारी संध्याकाळी व्हायरल झालेला हा फोटो ‘एअर फोर्स डे’च्या अज्ञात ठिकाणी आयोजित कार्यक्रमातील असल्याचे दिसून येत आहे.
मेन्यू मधील प्रत्येक पदार्थाला अशा शहराचे किंवा जागेचे नाव देण्यात आले आहे, जी जागा भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) दरम्यान लक्ष्य केली होती. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. म्हणजेच प्रत्येक पदार्थाचे नाव हे लष्करी कारवाईतील लक्ष्यांच्या नावावरून ठेवलेले होते.
आएएफच्या क्रेस्टच्या खाली मेन्यू देण्यात आलेला मेन्यू पुढील प्रमाणे आहे.
मेन्यू
रावळपिंडी चिकन टिक्का मसाला
रफिकी ऱ्हारा मटण
भोलारी पनीर मेथी मलाई
सुक्कूर शाम सवेरा कोफ्ता
सरगोदा दाल मखनी
जाकोबाबाद मेवा पुलाव
बहावलपूर नान
डेझर्ट
बालाकोट तिरामीसू
मुजफ्फराबाद कुल्फी फालुदा
मुरिदके मीठा पान
यामधील प्रत्येक नाव जसे की रावळपिंडी, बालाकोट, बहावलपूर, मुजफ्फराबाद, मुरिदके हे पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील शहरे आहेत, ज्यांना ऑपरेशन सिंदूर दरम्यान लक्ष्य करण्यात आले होते.
केद्रीय मंत्री किरेन रिजजू यांनी देखील हा मेन्यू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे
ऑपरेशन सिंदूरमधील टार्गेट
मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर – जैश-ए-मोहम्मद दहशतवादी गटाची केंद्र होते.
मरकज तैबा, मुरिदके – हे २०० एकरमध्ये पसरलेले लष्कर-ए-तैयबाचे कंपाउंड होते, या ठिकाणीही भारतीय लष्कराने निशाणा साधला होता.
मरकज अब्बास, कोटली – हा देखील एक जैश-ए-मोहम्मदचा महत्त्वाचा तळ होता, येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले होते.
स्येदना बिलाल आणि शवाई नल्ला कॅम्प, मुजफ्फराबाद – स्लीपर सेलकडून घुसखोरीसाठीचे या ठिकाणाचा वापर केला जात होता.
मरकज अल्हे हादिथ, बर्नाला – लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांसाठी हे एक प्रादेशिक लॉजेस्टिक हब होते.
सरजाल आणि तेहरा कलान, पाकिस्तान व्याप्त काश्मीर – नव्याने सहभागी झालेल्या दहशतवाद्यांसाठी भारतात घुसघोरीच्या आधी हा कॅम्प वापरला जात होता.
या ठिकाणी भारतीय हवाई दलाने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वापरून लक्ष्य केले होते.