‘टॉम अँड जेरी’ हा प्रत्येक लहान मुलाचा आवडता कार्यक्रम. त्यातील उंदीर आणि मांजराचा खेळ, उंदराचे मांजराला सतत त्रास देणे, उंदराला पकडण्यासाठीचे मांजरीचे निष्फळ प्रयत्न या आणि अशा अनेक गोष्टी लहान मुलांसह, मोठ्यांनाही या कार्यक्रमात गुंतवून ठेवायच्या. याच कार्यक्रमाची आठवण करून देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उंदरापुढे मांजरीने माघार घेतली आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये मांजर आणि उंदीर भांडत असल्याचे दिसत आहे. मांजरीला पाहताच सहसा उंदरं लगेच पळून जातात किंवा बिळात जाऊन लपतात. इथे मात्र याच्या उलट चित्र दिसत आहे. या व्हिडीओतील उंदीर चक्क मांजरीला मारत असल्याचे दिसत आहे, मांजरही त्याला उत्तर देत त्याला पंजाने मारते. पण तरीही या आगाऊ उंदराचे मारणे सुरूच असते. अखेर मांजर याला कंटाळून माघार घेत तिथून निघून जाते. पाहा व्हायरल व्हिडीओ.

आणखी वाचा: कौतुकास्पद! धरणाच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न; शेवटी…

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा- Viral Video: गाडीची टक्कर लागली अन्…; या कुत्र्याचा अभिनय एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, या व्हिडीओ ‘टॉम अँड जेरी’ कार्यक्रमाची आठवण करून देणारा आहे’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून खऱ्या आयुष्यातही काही वेळा मांजरीला इवल्याशा उंदरापुढे माघार घ्यावी लागत असल्याचे स्पष्ट होत आहे.