आपल्या हॉटेलमध्ये ग्राहक येण्यासाठी व्यापारी प्रत्येक युक्ती वापरून पाहतो. एखाद्या सणानिमित्त ऑफर ठेवणे, हॉटेलची आकर्षक लाईट्स किंवा ९० च्या काळातील वस्तुंनी हॉटेल सजवणे इत्यादी गोष्टी अनेक व्यापारी करतात. जेणेकरून ग्राहकांना नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेता येईल आणि त्यांना या आकर्षक ठिकाणी फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करता येतील. याच कारणाने त्यांच्या हॉटेलचे प्रमोशन सुद्धा होईल ; अशी बहुधा प्रत्येक व्यापाऱ्याची युक्ती असते. तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे ; ज्यामध्ये छोले भटुरे खाल्यानंतर वजन कमी होईल असा दावा हॉटेल करत आहे.

आपल्यातील अनेकांना चमचमीत पदार्थ खायला खूप आवडतात. पण, बरेच लोक आरोग्य आणि फिटनेस नियंत्रित ठेवण्यासाठी चमचमीत पदार्थ खाणे सोडून देतात किंवा टाळतात. तर हीच बाब लक्षात घेता एका व्यापाऱ्याने अनोखी युक्ती केली आहे. व्हायरल पोस्ट दिल्लीची आहे. गोपाल जी या हॉटेलच्या बाहेर प्रचंड गर्दी दिसते आहे. या हॉटेलमध्ये छोले भटुरे हा पदार्थ अगदीच प्रसिद्ध आहे. कारण – या हॉटेलबाहेर एक भलंमोठं पोस्टर लावण्यात आलं आहे. त्यांची कोणतीही अतिरिक्त शाखा नसून त्याचे दिल्लीत केवळ एकच हॉटेल आहे. असे सुद्धा सांगण्यात येत आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा ही व्हायरल पोस्ट.

हेही वाचा…अमेरिकेचा व्हिसा अर्ज नाकारला; व्यक्तीनं इमारतीच्या गच्चीवरचं ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चा पुतळा उभारला, पाहा VIDEO

पोस्ट नक्की बघा…

दिल्लीच्या हॉटेलमध्ये एक ग्राहक छोले भटुरे खाण्यासाठी गेलेला असतो, हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तो बाहेर लावलेला भला मोठा पोस्टर वाचतो आणि त्याचा फोटो काढतो. या पोस्टवर लिहिलेले असते की, ;छोले भटुरे खा, वजन कमी करा आणि आजारांना दूर ठेवा असे हिंदीमध्ये म्हणजेच ” छोले भटुरे खाओ, वजन घटाओ, बिमारी भगाओ” असे लिहिलेले असते. त्यानंतर ग्राहक तेथे जाऊन छोले भटुरे ऑर्डर करतो आणि ताटाचा व हॉटेलचे नाव दिसणारा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट @psychedelhic या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. आकर्षक, मजेशीर जाहिरातीचा फोटो, छोले भटुरे आणि हॉटेलचे नाव दिसणारा फोटो एडिट करून युजरने पोस्ट केला आहे. तसेच ‘फक्त दिल्लीत तुम्ही अशा गोष्टींची अपेक्षा करू शकता व हसण्याची एमजी’ या कॅप्शनमध्ये जोडण्यात आली आहे.नेटकरी ही पोस्ट पाहून मजेशीर प्रतिक्रिया तर व्यक्त करत आहेत. तसेच मार्केटिंगसाठी व्यापारी काहीही करू शकतात असे सुद्धा आवर्जून कमेंटमध्ये व्यक्त होताना दिसत आहेत.