Viral Video: भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका रिक्षाच्या मागे लिहलेला मेसेज सध्या व्हायरल होत असून प्रत्येकालाच विचार करायला भाग पाडतोय.
जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; आपण जे वागतो, बालतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं तर उद्या किंवा एक दिवस तुमच्यासोबतही ते घडू शकतं. जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याला आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते. हेच हा रिक्षाचालक पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
या ऑटोचालकाने आपल्या ऑटोच्या मागे असा संदेश लिहिला आहे की, तो पाहिल्यानंतर सगळं टेंशन विसरुन जाल. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, त्या रिक्षाच्या मागे, असं लिहिलंय तरी काय? रिक्षाच्या मागे लिहिलंय की, “कर्माचे फळ इथेच फेडावे लागते, मी फेडत आहे”
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ balasaheb_dhamale नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. रिक्षाच्या मागे लिहलेल्या मेसेजने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकानं म्हंटलंय, “हे बोलायला खूप मोठा धाडस लागतं” तर आणखी एकानं, “त्रास नेहमी ईमानदार माणसाच होतो, खरं बोलायला वाघाच काळीज लागत जे तुझ्यात आहे.”