काही लोकांना अॅडवेंचर गेम्स खेळायला खूप आवडतात. असे गेम्स जे पाहून सर्वसामान्यांना चक्कर येईल. जगात अनेक साहसी लोक असतात. ज्यांना हटके आणि धाडसी गोष्टी करायला आवडतात. असं म्हणतात की अशा खेळांमुळे एक प्रकारची किक मिळते, अंगात एक वेगळीच उंचा संचारते. तो एक प्रकारचा अविस्मरणीय अनुभव असतो असं म्हणा ना, मात्र हा अनुभव काही वेळेस जिवावर देखील बेततो. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

अनेकदा अ‍ॅडव्हेंचर पार्कमधील मोठमोठ्या राईड्सवर गंभीर अपघात होतात. काही वेळा मोठमोठे झोके अडकल्याचेही प्रकार समोर आले आहेत. दरम्यान अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये रोलरकोस्टर तुटल्यानंतर एक गृप जवळजवळ ३ तास उलटे लटकत राहिला. अमेरिकेतील विस्कॉन्सिनमधील क्रॅंडन येथील फॉरेस्ट काउंटी फेस्टिव्हलमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रोलरकोस्टर अडकल्याने ३ तास मुलं हवेत उलटी लटकली

रोलर कोस्टर बंद पडला तेव्हा त्यात आठ लोक बसलेले होते. यामधील ७ जणं लहान मुलं होती. यानंतर त्यांची सुटका करण्यासाठी तब्बल तीन तास लागले. कारण आपातकालीन पथकाला बचावकार्य करण्यास फार वेळ लागत होता. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावण्यात आलं होतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – सावधान! इंदोरमध्ये भरस्त्यात तरुणीचा मोबाईल हिसकावला; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO

रोलर कोस्टर कसा काय अडकला?

कोस्टिचका यांनी सांगितलं की “त्या मुलांनी फार हिंमत दाखवली. ते फार घाबरले होते आणि बराच वेळ हवेत उलटे लटकत होते”. अधिकाऱ्यांनी दिलेल्य माहितीनुसार, रोलर कोस्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. पण त्यामागील नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. क्रँडन अग्निशमन विभागाचे कॅप्टर ब्रेनन कुक यांनी डब्ल्यूजेएफडब्ल्यू टीव्हीशी बोलताना सांगितलं की, एक यांत्रिक त्रुटी आली होता इतकीच माहिती आमच्याकडे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या पाळण्यात लहान मुलंही मोठ्या प्रमाणावर बसतात, त्यामुळे पाळण्यांच्या सुरक्षांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.