Viral video: रस्त्यावर खड्डे काही आपल्यासाठी नवे नाहीत. मात्र राजधानी लखनौच्या विकासनगर परिसरामध्ये भर रस्त्यात मोठा खड्डा पडला. हा खड्डा छोटा मोठा नसून तब्बल ७ मीटर लांब, ५ मीटर रुंद आणि ५ मीटर खोल एवढा मोठा होता. एवढंच नाही तर या खड्ड्यात तिथून जाणारी कारही अडकली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वांनाच व्हिडीओ पाहून धक्का बसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावरुन गाड्या जात असताना अचानक रस्ता खचून खड्ड्यात गेल्याचं दिसून येत आहे. रस्ता खचल्यानंतर तिथे एक मोठा खड्डा तयार झाला. हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे. आणि नेमकी यावेळी रस्त्यावरुन जाणारी कार त्या खड्ड्यात अडकते.रस्ता अचनाक खोल दरीमध्ये गेल्याने ही कार अर्धी खड्ड्यात आणि अर्धी रस्त्यावर अशा स्थितीत उभी होती. कार चालकाचा जराजरी तोल गेला असता तर ही कार खड्ड्यामध्ये पडली असती. नंतर ही कार क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> डोकं आहे की ओपनर? पठ्ठ्यानं १ मिनिटांत डोक्यानं उघडली ७७ बाटल्यांची झाकणं; VIDEO एकदा पाहाच

पीडब्ल्यूडी च्या मते, रस्त्याखाली असलेल्या जल विभागाच्या ट्रंक सीवर लाइनमधून सातत्याने पाण्याची गळती होत होती. त्यामुळे रस्त्याखालून सातत्याने मातीची झीज होत होती. त्यामुळेच रस्त्याचा पाया नुकसानग्रस्त झाला आणि रस्ता खचला. याच्या दुरुस्तीसाठी पाणी विभागाच्या कार्यदायी संस्थेला घटनास्थळी बोलावण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @zoo_bear नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. काहींना तर व्हिडीओ पाहून हसू आवरेना. तर काही युजर्सनी म्हटलंय की, “कार खड्ड्यातून बाहेर आल्यानंतर तिला कंट्रोल करण्यासाठी कुणीतरी आतमध्ये बसायला हवं होतं.” तर काही युजर्सनी या व्हिडीओवर वेगवेगळे विनोद शेअर सुरू करण्यास सुरूवात केलीय.