Navi mumbai snake video: अवकाळी पावसामुळे राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांत इतका मुसळधार पाऊस पडतो आहे की लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय, मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अनपेक्षित पावसामुळे जागोजागी पाणी साचलं आहे.पण लक्षवेधी बाब म्हणजे, पावसामुळे रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात चालताना थोडं सावध राहणं आवश्यक आहे. कारण या पाण्यात सापही असू शकतात. होय, नवी मुंबईतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या ठिकाणी चक्क रस्त्यावर एक भलामोठा अजगर सापडला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर पावसात रस्त्यावरुन हा भलामोठा अजगर दिसत आहे, हिरव्या रंगाचा विषारी अजगर जाता आहे. आता विचार करा की या पाण्यात आपण चालतोय आणि चुकून अजगरावर पाय पडला तर काय होईल…नक्कीच साप चावणार. या अजगराला पाहून लोकही घाबरले असून रस्त्याच्या कडेला थांबलेले दिसत आहेत. हा लांब लचक साप पाहून सर्वच घाबरले आहेत. दरम्यान, ही संपूर्ण घटना आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ सावधतेचा इशारा मानूनच पाहा. कारण साचलेल्या पाण्यातून चालताना कधी काय पायाखाली येईल, सांगता येत नाही. त्यामुळे काळजी घ्या.

पावसाचं पाणी बिळात शिरल्यानंतर सरपटणारे प्राणी बाहेर येतात. यात सापांचाही समावेश असतो. ओल्या ऐवजी कोरड्या जागेत राहणे साप पसंत करतात. त्यामुळं पावसाळ्यात साप बिळाबाहेर पडून आपल्या सोयीची जागा शोधण्याचा प्रयत्न करतात. पावसाळ्याच्या दिवसांत साप निघण्याचं प्रमाण बरंच वाढत असतं.पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशानं अनेक लोकांचा मृत्यू होतो. पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्पदंश टाळण्यासाठी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यावर वेळेवर उपचार न मिळणे, दवाखाण्यात जाण्यासाठी वाहन न मिळणे, दवाखाना लांब असणे, दवाखान्यात सर्पदंशावरील लस उपलब्ध नसणे, अशा कारणांनी नागरिकांना सर्पदंशानंतर आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळं पावसाळ्याच्या काळात शेतकरी आणि विशेत: ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mumbai_tve नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.