Romantic Proposal video viral: ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणायचे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. हो, प्रेम कधी कुठे कोणासोबत होईल यांचं काही नेम नाही. तसंच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रेम बॉलिवूडमधील कलाकारांचे असो किंवा सर्वसामान्यांचे प्रेम हे प्रेम असतं. ती एक खूप सुंदर भावना आहे. सोशल मीडियावर आपण दररोज अनेक व्हिडीओ पाहतो ज्यात कपल आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करतात.

मुलं ही आपल्या आवडत्या मुलीचा होकार मिळवण्यासाठी प्रपोजच्या हटके आयडीया ट्राय करत असतात. स्टेडियमवर प्रपोज करणे यात तसं काही नवं नाही. आपण अनेकदा क्रिकेटच्या किंवा फुटबॉलच्या मॅचदरम्यान, स्टेडियमवर प्रेक्षकांमध्ये बसून मित्र किंवा मैत्रिणीला प्रपोज केल्याचं पाहिलं आहे. मात्र सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये तरुणानं चक्क हवाई बेटावरील किलाउए ज्वालामुखीच्या शेजारी बसून गर्लफ्रेंडला प्रपोज केलं आहे. दरम्यान त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही महिन्यांपूर्वी एका कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये बॉयफ्रेंड हवाई बेटावरील किलाउए ज्वालामुखीच्या शेजारी बसून गर्लफ्रेंडला प्रपोज करत होता. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. एक तरुण ज्वालामुखीसमोर गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घालतोय. पण त्याने अंगठी पुढे करताच अशी एक घटना घडली, ज्याला लोक निसर्गाचा चमत्कार म्हणत आहेत. या तरुणाने ग्वाटेमाला देशातील व्होल्कॅन अकाटेनांगो या ठिकाणी गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, फोटोशूट सुरू असताना तरुणाने गुपचूप खिशातून अंगठी काढली आणि गर्लफ्रेंडला आश्चर्यचकित केलं. मग गुडघ्यावर बसून तिला लग्नासाठी मागणी घातली.यावेळी पुढच्याच क्षणी तरुणीनं होकार देताच पाठीमागे डोंगरावर ज्वालामुखी फुटला आणि त्यामधून लाव्हारस बाहेर पडू लागला. हे इतकं अविश्वसनीय होतं की आसपास जमलेल्या लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. हा दिवस या कपलच्या आयुष्यभर लक्षात राहील.

पाहा व्हिडीओ

प्रत्येक मुलीनं आपल्या जोडीदाराबाबत काही स्वप्नं रंगवलेली असतात. त्यापैकी एक म्हणजे तिला भेटणाऱ्या जोडीदारानं तिला रोमँटिक असं प्रपोज करावं. बरं आपल्या आवडत्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी मुलंदेखील काय काय नाही करत. प्रत्येकाचा वेगळ्या पद्धतीनं प्रपोज करण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून तरुणीकडून होकार आलाच पाहिजे.