Viral video: रस्त्यावर कधी काय घडेल काही सांगू शकत नाही. रोज काहीतरी नवीन ड्रामा, भांडणं, अपघात, घडत असतात. रस्त्यावर गाडी चालवताना लोकांची अनेक भांडणं होतात. ही भांडणं अनेकदा मारामारी पर्यंतही पोहोचताना पहायला मिळतात. अशातच रस्त्यावर वाद झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. ओव्हरटेकच्या वादातून एका कारचालकाने बुलेटला टक्कर दिली आहे. रस्त्यावर अनेक भरधाव गाड्या धावत असतात. अशातच रस्त्यांवर अपघात घडण्याचे प्रमाणही खूप वाढलंय. कधी, कुठे आणि कसा अपघात घडेल याविषयी काही सांगू शकत नाही. एकापेक्षा एक भीषण अपघाताच्या घटना समोर येत असतात. यामध्ये आणखी एका अपघाताची भर पडली असून एक व्हिडीओ समोर आलाय. बुलेट आणि स्पोर्ट्स बाइकच्या धडकेत गाड्यांची अशी अवस्था झालीय की पाहून अवाक् व्हाल.

अनेकदा घाईमध्ये लोक दुसऱ्या वाहन चालकांना टेकओव्हर करुन जातात. तर काही लोक मुद्दाम कट मारुन जातात. मात्र असं केल्यामुळे अपघात घडतात. असाच एक अपघाताचा व्हिडीओ सध्या समोर आलाय, जो पाहून तुम्हीही चक्रावून जाल.अपघाताच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बुलेटवाला मागून येऊन दोन दुसऱ्या बाईकमधून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. ही त्याची चूक त्याला नडते आणि तो जोरात धडकून खाली पडतो. दोन गाड्यांमध्ये जास्त अंतर नसतानाही मागून येऊन हा मधे घुसला. मात्र हा व्हिडीओ पाहताना नक्की चूक कुणाची आहे हेच लक्षात येत नाहीये. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि सांगा चूक नक्की कुणाची?

या अपघातामध्ये चालक बचावला असला तरी गाडीचे मोठे नुकसान झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून बुलेट प्रेमींना व्हिडीओ पाहून नक्कीच वाईट वाटेल. एके काळी बुलेटचा आवाज आला की, दूधवाला आला अशीच या गाडीची ओळख होती. पण, आता या गाडीची तरुणांमध्ये क्रेझ आहे. स्वस्तातील फोरव्हीलरपेक्षा महाग असलेल्या या गाडीमुळे रुबाब वाढतो, असे तरुणाईचे ‘इंप्रेशन’ आहे. त्यामुळेच आता कॉलेजच्या पार्किंगमध्ये बुलेट दिसू लागली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: माणुसकीचं दर्शन! रखरखत्या उन्हात तरुणानं पोलिसांना दिलं पाणी; पुढे पोलिसांनी काय केलं एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@Ghar Ke Kalesh नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ जोरदार चर्चेत आला आहे. याशिवाय थोड्याच वेळात व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे.