सर्व तणावाच्या परस्थितीत, युद्धाच्यामध्ये असा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे जो चांगलचं चर्चेत आला आहे. युक्रेनियन सैनिकांच्या दयाळूपणाने सर्वांचे मन जिंकले. मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, युक्रेनियन सैनिक थंडीत बाहेर एकट उभ्या असलेल्या एका पिल्लाला आतमध्ये घेतना, त्यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. हे पिल्लू बाहेर सैनिकांसाठी पहारा देत उभे होते.

काही मिनिटांच्या व्हिडीओमध्ये, सैनिक सांगतात की, “तो आमचा संरक्षक आहे, बरोबर रॅम्बो?” असे म्हणताना ऐकू येते. “आम्हाला त्याच्याबद्दल वाईट वाटले. बाहेर थंडी वाजत होती. आम्ही त्याला आमच्या चौकीत नेले आणि तो आमच्याबरोबर राहिला,” सैनिक पुढे म्हणाले.

(हे ही वाचा: “भारतात परत येईल तर माझ्या कुत्र्यासोबतच…” युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याचा Video Viral)

(हे ही वाचा: Russia Ukraine war: “मला पृथ्वीवर शांतता हवी आहे…” चिमुरडीने केलं भावनिक करणार आवाहन!)

पोटावर पांढऱ्या रंगाची रेषा असलेले लहान काळे पिल्लू शेपूट हलवताना दिसत आहे. “तो आमची सुरक्षा करतो. ते त्याचे काम आहे, तो आमचा वॉचडॉग आहे,” कुत्र्याच्या पिल्लाला पळवून लावणारा दुसरा सैनिक म्हणाला. पिल्लू आता त्यांच्या पोस्टच्या बाहेर “गार्ड” उभा आहे आणि तो आपले काम चोख बजावत होता.” दुसरा एक सैनिक म्हणाला की, “रॅम्बो चांगले काम करत आहे! सर्वोत्तम कुत्रा”

(हे ही वाचा: Viral: सोने तस्करीचा फॅशनेबल प्रयत्न; बुरख्यालाच सोन्याचे मणी लावून भारतात आली पण…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ Reddit आणि इतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला होता, जिथे वापरकर्ते रॅम्बो बद्दल बरीच चर्चा करत होते.