माणुसकी हा सर्वांत मोठा धर्म आहे, हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. २०० फूट खोल दरीत दोन दिवसांपासून अडकलेल्या एका कुत्र्याला जीवाची पर्वा न करता स्थानिक तरुणांनी थरारक बचाव करत सुरक्षित बाहेर काढले. या शौर्यपूर्ण कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र हा सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये वसलेला आहे. सह्याद्री पर्वतरांगा हे महाराष्ट्रातील एक सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. येथे अनेक थंड हवेची ठिकाणे, ट्रेकिंगसाठी डोंगर, गड-किल्ले आणि धबधबे आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे काम अनेक सह्याद्री मित्र करत आहे. डोंगराळ भागात, धबधब्यात किंवा दरीत अडकलेल्या लोकांची सुटका करतात आणि माणुसकीच्या धर्माचे पालन करतात. अशाप्रकारे एक कुत्रा देखील दोन दिवसांपासून २०० फूट दरीत अडकला होता ज्याला सह्याद्री मित्रांनी वाचवले आहे अन् खऱ्या अर्थाने माणुसकी जपली आहे.
माथेरानमधील लोकप्रिय इको पॉइंटच्या समोर असलेल्या लँडस्केप पॉइंटजवळील १५०-२०० फूट खोल दरीतदोन दिवसांपासून अडकलेल्या एका कुत्र्याला वाचवण्यात आले आहे. दरीत अडकलेला कुत्रा थकलेला आणि अस्वस्थ दिसत होता. सोमवारी संध्याकाळी सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संघटनेच्या बचाव पथकाने यशस्वीरित्या वाचवले. या बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडयावर व्हायरल होत आहे.
घाटातून कुत्र्याच्या रडण्याचा आला आवाज, स्थानिकांना तातडीने इशारा
दुपारी ३ वाजता सुरू झालेले हे ऑपरेशन्स सायंकाळी ५:३० वाजता संपले. हे ऑपरेशन आव्हानात्मक आणि धोकादायक परिस्थितीत पार पाडण्यात आले. कुत्रा दरीत पडला होता आणि रडत होता. आठवड्याच्या शेवटी स्थानिक रहिवाशांना कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू येत होते.
कुत्रा अनेकदा लपून बसायचा ज्यामुळे स्थानिकांना वाटायचे की कुत्रा त्या ठिकाणाहून निघून गेला आहे. परंतु सोमवारी स्थानिकांनी कुत्रा पुन्हा अडकलेला पाहिला आणि बचाव पथकाला माहिती दिली.
बचावानंतर भटक्या कुत्र्याला दुखापत न होता सापडला (Stray Dog Found Uninjured After Rescue)
उतार आणि धोकादायक भूभाग असूनही, प्रशिक्षित स्वयंसेवकांनी प्राण्याला कोणतीही दुखापत न होता बचावकार्य पूर्ण करण्यात यश मिळवले. बचावकर्त्यांचा असा विश्वास आहे की,”कुत्रा चुकून दरीत घसरला असावा. तो एक भटका कुत्रा होता आणि तो तंदुरुस्त होता. त्यालाही कोणतीही दुखापत झाली नाही,” नाईक पुढे म्हणाले.
बचावकर्त्यांच्या पथकात नाईक यांच्यासह सुनील ढोले, चेतन कलामे आणि उमेश मोरे यांचा समावेश होता.