मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा शुबमन गिल याच्याशी साराचं अफेयर असल्याची चर्चा सध्या खूप गाजतेय. साराने IPL सुरू झाल्यावर शुबमनचा एक मैदानावरील फोटो इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर पोस्ट केला होता आणि त्याखाली एक लाल रंगाच्या हार्टचा इमोजीही टाकला होता. त्यामुळे ती चर्चेत होती. त्यानंतर आता एका महान क्रिकेटपटूने केलेल्या कमेंटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
सचिनची लेक सारा ही शिक्षणासाठी लंडनमध्ये असते. पण लॉकडाऊन काळात ती मुंबईतच आहे. गेले काही दिवस सचिन आपल्या कुटुंबीयांना विविध वस्तू बनवून खाऊ घालत होता. पण नुकतीच सचिनची लेक सारा हिने एक डिश तयार करून सचिन आणि इतर कुटुंबीयांना सर्व्ह केली. साराने बनवलेल्या ‘बुद्धा बाऊल’ या खास डिशचा फोटो सचिनने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यात काय-काय वस्तू वापरण्यात आलेत याचंही रसभरित वर्णन केलं.
या फोटोवर एका महान फलंदाजांने केलेली कमेंट साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारी ठरली. विंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने सारा आणि सचिन या दोघांनाही टॅग करत या पदार्थाचं कौतुक केलं.
दरम्यान, सचिनने पोस्ट केलेल्या या फोटोला २ दिवसांत साडेसहा लाखांहून अधिक लाइक्स मिळाले.