पुणे म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येते ती सारसबाग. पुण्याचं आणि सारसबाग यांच नातं तसं जुनंच आहे पण दिवाळीमध्ये सारसबाग म्हणजे दिवाळी पहाट हे ठरलेलं आहे. दरवर्षी दिवाळी पहाट निमित्त संपूर्ण सारसबाग दिव्यांनी सजवली जाते हे पाहण्यासाठी मोठ्या संख्यने पुणेकर भल्यापहाटेच सारसबागेत हजेरी लावतात. याचबरोबर दिवाळी पहाट निमित्त येथे खास संगीत मैफिल देखील आयोजित केली जाते. शास्त्रीय संगीत आणि नृत्याची आवड असणारे लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून येतात. गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालय शिकणारे तरुण-तरुणी मोठ्या संख्यने येथे भेट देण्यासाठी येतात. यंदाही पुण्यातील सारसबागेत अनेक पुणेकरांनी दिवाळी पहाट निमित्त हजेरी लावली. सोशल मीडियावर दिवाळी पहाटचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण एका व्हिडीओने सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिवाळी पहाटनिमित्त आलेल्या अनेक उत्साही पुणेकर डान्स करताना दिसत आहे. कोणी टेडी बिअरचा पोशाख परिधान करून नाचताना दिसत आहे तर कोणी गणपती मिरवणुकीत नाचल्यासारखे तरुण नाचताना दिसत आहे. कुठे काका बिनधास्तपणे नाचत आहे तर कुठे काकू गाण्यावर थिरकताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणे अशक्य झाले आहे. व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – फटाक्यांनी भरलेली पिशवी घेऊन जाताना फुटला सुतळी बॉम्ब, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; थरारक घटनेचा Video Viral

इंस्टाग्रामवर punekar2.0_og’s पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कोणी कोणी आज हजेरी लावली सारसबागेत”

अनेकांनी व्हिडिओ पाहून पू्र्वीची दिवाळी पहाट किती सुंदर होती हे सांगितले तर काहींनी सारसबागेमध्ये जाऊन नाचणाऱ्या लोकांवर टिका केली.

व्हिडिओ पाहून निराश झालेल्या एका पुणेकराने म्हटले की,”हे होणार होत माहिती होत म्हणून या वर्षी गेलोच नाही. रील्सवाल्यानी सांगायचं इथं इथं हे आहे मग काय पुणेकर येणार. अरे ती जागा classical singing ची होती .. दिवाळी पहाट कार्यक्रम शुद्ध शास्त्रीय संगीताचा होता, हा काय कोणाचा तरी लग्नाचा वरातीचा व्हिडिओ बघितल्याची भावना येतीये . यार हे लोक पुण्यातल्या प्रत्येक गोष्टीची मातीच करून राहणार आहेत जेणे करून ते जिथून आलेत तिथली आठवणच नाही येणार. आठवणीतल पुणे शेवटचे श्वास मोजताना दिसतंय”

हेही वाचा- कोण आहे अनिश सरकार? तीन वर्षाच्या चिमुकल्याने जिंकले आनंद महिंद्रा यांचे मन, Video शेअर करत केले त्याचे तोंडभरून कौतुक

u

“मला खूप आनंद झाला आहे की, आम्ही मूळ दिवाळी पहाट २०२५ पूर्वी करू शकलो. असे दुसऱ्याने म्हटले.

तिसऱ्याने म्हटले की, “खरे आणि मूळचे पुणेकर आता दिवाळी पहाटसाठी सारस बागेत फारसे जात नाही”

चौथ्याने लिहिले की, “RIP सुसंस्कृत का काय ते”

पाचवा म्हणाला की, “हे सगळे बाहेरून आलेले आहेत.. कट्टर पुणेकर असे वागत नाही”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहावा म्हणाला, “हे पुणेकर नाहीत. हे पुणे बघायला आलेले लोक आहेत.”