Satara Accident video viral: सोशल मीडियावर सतत नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत राहतात. मात्र, यात सगळ्यात जास्त पसंती स्टंट व्हिडिओला मिळते. स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल होतात. स्टंटचे हे व्हिडिओ बहुतेक लोकांचं लक्ष वेधून घेतात आणि लोक हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही करतात. मात्र, अनेकदा स्टंट करत असताना भलत्याच घटना घडतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सडावाघापूरच्या उलट्या धबधब्याजवळ भयंकर दुर्घटना घडली. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल.
सध्या तर तरुणांमध्ये स्टंटची प्रचंड क्रेझ वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सगळ्यांनाच स्टंट करून सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हावं असं वाटतं, पण स्टंटबाजी कधीही जिवावर बोत शकते. हे लोकांनी समजून घ्यायला हवं. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओही असाच आहे. यात एक तरुणानं केलेली स्टंटबाजी त्याच्या जीवावर बेतली आहे.
पाटण तालुक्यातील सडावाघापूरच्या उलट्या धबधब्याजवळ एक दुःखद घटना घडली. येथे पर्यटकांची कार जवळपास ३०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत साहिल जाधव नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. . टेबल पॉईंटवर स्टंट करताना कारचं नियंत्रण सुटलं आणि कार खोल दरीत कोसळली. कारचा वेग, योग्य प्लॅनिंग चुकल्यामुळे हा अपघात झाल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. तो गोळेश्वर, कराडचा रहिवासी आहे. इतर चौघे मित्र फोटो काढण्यासाठी खाली उतरल्याने बचावले. कारचे चाक गवतावरून घसरले आणि चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानातर असे स्टंट करु नका असं आवाहान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे…
पाहा व्हिडीओ
जखमीला तातडीने कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सडावाघापूरचा उलटा धबधबा बघायला रोज खूप पर्यटक येतात. टेबल पॉईंट हे पर्यटकांसाठी खास ठिकाण आहे. पण याच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे फोटो काढताना खूप काळजी घ्यायला हवी. दरम्यान, या घटनेनंतर पर्यटकांना सूचना दिली आहे की, “पर्यटनाचा आनंद लुटा, पण स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. निष्काळजीपणामुळे जीव धोक्यात येऊ शकतो.”
सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून उत्साहाच्या भरात प्रसिद्धीसाठी असे प्रकार न करण्याचं आवाहन केलं जात आहे.