Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर त्या गोष्टीचा कोणी अंदाज सुध्दा लावू शकतं नाही. कधी कोणी घरी बसून हेलिकॉप्टर तयार करीत आहे. तर कधी कोणी घरी बसून स्कूटर तयार करीत आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून प्रत्येकजण हैराण झाले आहेत.मान्सूनची राज्यात एन्ट्री होताच पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यभरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद झाली आहे. पावसाच्या या तुफान बॅटिंगने अनेक पूरस्थिती निर्माण होऊन ठिकाणी गाड्या, जनावरे, वाहून गेल्याच्या घटना घडत आहेत, ज्याचे व्हिडिओही माध्यमांवर व्हायरल होत आहेत. अशातच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका तरुणाचा थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. इथला हा व्हिडीओ आहे. जिथं रस्त्यांची अक्षरशः दैना झाली आहे. रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे. शेतामध्येही चिखल झाला आहे. चिखल इतका की नीट चालताही येणार नाही. पण अशा रस्ता एका तरुणाने खांद्यावर घेऊन पार केला आहे. पावसाने केलेल्या बॅटींगनंतर मात्र त्या कसलीही परवा न करता आपली गाडी उचलून नेली. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता भलीमोठी बाईक खांद्यावर घेऊन तरुण चिखलातून वाट काढत चालताना दिसतो आहे. त्यानंतर या तरुणानं शेवटी ही बाईक थेट खाली टाकलीय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, सातारकरांचा नाद नाय बाबा…
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी सातारचा बाहुबली म्हणत या तरुणाचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी शाब्बास रे पठ्ठ्या म्हणत या तरुणाचे कौतुक केले आहे.
माण, खटाव, फलटणसारख्या दुष्काळी तालुक्यांनाही पावसाचा तडाखा बसला आहे. रस्ते बंद झाले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असला, तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने पूरग्रस्तांना मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाचा जोर पाहता, प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.