Woman Piggy Bank Saving Viral Video : पैशांची बचत करणं ही एक चांगली सवय आहे, अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पैशांची बचत करतात. काही जण बँक किंवा गुंतवणुकीचा आधार घेतात. पण, बरेच लोक छोट्या बचतीसाठी पिगी बँकचा आधार घेतात. पिगी बँकचा ट्रेंड हा खूप वर्षांपासून आहे, ज्या माध्यमातून लहानांपासून मोठेही चांगला पैसा जमा करतात. अलीकडेच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात ती तिच्या फोडलेल्या पिगी बँकमधून अर्थात गल्ल्यातून नोटांचा खच काढून मोजताना दिसतेय. तिने गल्ल्यात सेव्ह केलेल्या नोटा पाहून तुमचेही डोळे फिरल्याशिवाय राहणार नाही.

महिलेने फोडली पिगी बँक

व्हिडीओत पाहू शकता की, महिला मातीचा एक मोठा गल्ला लोखंडी रॉडने फोडतेय. यावेळी गल्ल्यात अगदी १० रुपयांपासून ते २०, ५०, १००, २०० आणि ५०० च्या अनेक नोटा दिसतायत, ज्या या महिलेने अगदी बारीक दुमडून कोंबून गल्ल्यात भरल्या आहेत. जेव्हा ती पिगी बँक पूर्णपणे फोडते, तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात नोटा बाहेर पडतात. एक एक करून तिथे नोटांचा मोठा खच दिसतोय. यावरून अंदाज येऊ शकतो की, महिलेने किती कष्टाने हा पैसा वाचवला असेल. कारण इतक्या छोट्या गल्ल्यात हजारो रुपये साठवणे खरोखरचं आश्चर्यकारक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलेच्या सेव्हिंगचा हा व्हि़डीओ @_hindu_bhupendra_kashyap या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, “खरा काळा पैसा घरातील महिलांकडे असतो.” दुसऱ्याने लिहिले की, “पैसे वाचवणारी महिला ही खरी लक्ष्मी असते, गरजेच्या वेळी त्यांचे पैसे कामी येतात.” कोणीतरी विनोदाने म्हटले की, “आता त्या महिलेच्या घरावर आयकर विभाग छापा टाकणार आहे!”