Funny Viral Video India: सोशल मीडियावर दररोज लाखो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही विषय मजेशीर; तर काही गंभीर असतात. सोशल मीडियावर रस्त्यावर लावलेल्या पाट्या, घर किंवा कार्यालयाबाहेर लावलेले सूचना फलक, वाहनांच्या मागे लिहिलेली घोषवाक्यं मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. काही पाट्या मजेशीर असतात; तर काही पाट्या थक्क करणाऱ्या असतात. सध्या असंच एक कारवरील वाक्य वाचल्यावर तुम्हालाही ते विचार करायला भाग पाडेल हे नक्की. सध्या हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

रस्त्यावरून जाताना तुम्ही अनेकदा ट्रक, टॅक्सी वा रिक्षावर भन्नाट असं काहीतरी लिहिलेलं वाचलं असेलच. त्यातील काही कोट्स फार भावनिक अन् विचार करायला भाग पाडणारे असतात. त्यामुळे वाहनांवरील हे कोट्स अनेकदा लोकांचं लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये पत्नीने पतीवर हल्ला केल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामध्ये ‘राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी’ यांचं खळबळजनक खून प्रकरणही गाजलं आहे. त्यामुळे बायकोच्या भीतीची एक गंमत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एका पतीनं आपल्या बायकोच्या भीतीमुळे कारवर असं काही लिहिलं आहे की, जे पाहून नेटिझन्स अक्षरश: हसून बेजार झाले आहेत. हरियाणामधून समोर आलेला हा भन्नाट संदेश रस्त्यावर रात्री फिरणाऱ्या एका गाडीच्या मागे लावलेल्या एलईडी लाइट बोर्डवर लिहिलेला असल्याचं आढळलं आहे “कृपया अंतर ठेवा, गाडी लागली तर बायको मारेल!” अशा या संदेशासोबतच त्यावर रडका इमोजीही झळकत आहे. हे पाहून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरश: पूर आला आहे.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ एका व्यक्तीनं आपल्या कारमधून समोर असलेल्या कारचा रेकॉर्ड करून टाकला आहे. सध्या या व्हिडीओला १० दशलक्षहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत आणि सहा लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी विनोदांची अक्षरश: आतषबाजी केली आहे, तसेच त्याबद्दलच्या काही मजेशीर कमेंट्स खालीलप्रमाणे :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकानं लिहिलं, “मर्द को भी दर्द होता है!” दुसऱ्यानं लिहिलं, “भाऊसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करा!” तिसरा म्हणाला, “हात जोडून मागेच राहा, नाही तर घरी रिपोर्ट लागेल.”, आणखी एकानं लिहिलं, “असा नवरा मलापण चालेल… फक्त आधी गाडी घ्यायला लाव.”