Viral video: सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होत असतात. यात काही भांडणाचे व्हीडिओही पाहायला मिळतात. भररस्त्यात अगदी शुल्लक कारणावरुनही अनेक भांडणे, हाणामारी होत असतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये आता आणखी व्हिडीओची भर पडली आहे. ज्यामध्ये शाळकरी मुली जोरदार भांडत आहेत. त्या नुसत्या भांडत नसून एकमेकांना मारत देखील आहेत. हे भांडण चालू असताना आजूबाजूला असलेले इतर विद्यार्थी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्या एकायला तयार नाही. शाळकरी मुलींच्या हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही शाळकरी मुली शाळेच्या बाहेरच एकमेकींचे केस ओढताना आणि एकेमकांना मारताना दिसत आहेत. दोन तरुणींमध्ये जोरदार भांडण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या मुली एकमेकींचे केस ओढत आहे, तर दुसरी लाथा घालतेय. तर कुणी तिला खाली पाडण्याचा प्रयत्न सुद्धा करतांना दिसून येतंय. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी या भांडणाचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिवर नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “खोया खोया चांद” मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा ड्रायव्हरचं अनोखं टॅलेंट; VIDEO पाहून सुप्रसिद्ध संगीतकाराने घेतली दखल
मुलांचे असो किंवा मुलींचे असो…. हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच मुलांमध्ये असो किंवा मुलींमध्ये वाद होत असतात आणि त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये होत. त्यांच्या हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तरुणांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसी खाक्या दाखवण्याची आवश्यकता असल्याचं बोललं जात आहे.