बहुतेक लोकांसाठी पदवीदान समारंभ त्यांच्या जीवनातील सर्वात खास दिवसांपैकी एक असतो. तुमच्या आई-वडीलांसमोर पदवीधर होणे हा क्षण खूप खास असतोकारण तुमच्या यशात त्यांचा हातभार आहे. अनेकजण आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि कुटुंबीयांच्या मदतीला देतात. नुकताच एका सुरक्षा रक्षकाच्या मुलीने तिला परदेशात शिकण्यासाठी पाठवल्याबद्दल वडिलांचे आभार मानत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओर आयुष्मान खुराना आणि boAt चे संस्थापक अमन गुप्ता यांच्यासह सेलिब्रेटींकडून वडील आणि लेकीच्या प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या क्लिपच्या कॅप्शनमध्ये धनश्रीने लिहिले, “माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद बाबा.

व्हिडिओची सुरुवात वडील आणि मुलीच्या अभिनंदनाच्या मिठीने होते. तरुणीला नुकतेच यूकेच्या एका प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळाला होता त्यानंतर विमानतळाचे दृश्य दिसते जिथे वडील आपल्या मुलीला निरोप देतात कारण तिच्या आयुष्याचील नवीन प्रवासासाठी निघाली आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये पदवीदान समारंभाच्या काही क्षणांची झलकही दिसत आहे. जेव्हा धनश्री पदवी प्राप्त करण्यासाठी स्टेजवर जाते तो आनंदाचा क्षणही दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ज्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की, तुम्ही एक गार्ड आहात तुम्ही तुमच्या मुलीला परदेशात पाठवू शकत नाही” पण त्यांनी ते करुन दाखवले. ते माझे लाईफगार्ड आहेत.”

हेही वाचा – भावाला इंडिगोमध्ये नोकरी मिळाली, एअरहोस्टेस बहिणीने दिले सरप्राईज, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकले नेटकऱ्यांचे मन

शेअर केल्यावर, क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १७ मिलियनपेक्षा जास्तवेळा पाहिला आहे आणि १.८ पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. डिजिटल कंटेंट क्रिएटर आणि एक्टर डॉली सिंह म्हणाले, ‘मला अश्रू अनावर होत आहे”

boAt चे संस्थापक अमन गुप्ता यांनी लिहिले, “प्रेरणादायक. तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना खूप शक्ती मिळो.”

अभिनेता आयुष्मान खुरानाने देखील हार्टचे इमोजीसह भावुक व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली.

एकाने लिहिले, ”तुमचे वडील एक सुपर हीरो आहेत.”

एक शख्स ने लिखा, ”आपके पिता एक सुपर हीरो आहे.”

हेही वाचा – Leap Year 2024 : २९ फेब्रुवारीला ‘या’ देशात महिला करतात पुरुषांना प्रपोज! जाणून घ्या लीप वर्षातील रंजक गोष्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाने सांगितले, “देव तुम्हा दोघांनाही आशीर्वाद देवो.” एका सदस्याने लिहिले आहे की, “भारतीय वडील सर्वात चांगले होते. पश्चिमेकडील मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी साईड जॉब करतात, परंतु विद्यार्थी कर्ज चुकवण्यास सक्षम नाहीत. परंतु आमचे भारतीय वडिल पैशांची कमतरता होऊ देत नाही. तरीही खूप जास्त काळजी घेते. खरंच आभारी आहे, “दुसऱ्याने लिहिले, “‘वडील ‘ ती व्यक्तीजे अशक्यही शक्य करू शकतात.” तिसरा म्हणाला, “आपल्या वडिलांचा गौराव करण्यासाठी धन्यवाद. त्यांचा जगातील सर्व सुख मिळो तुला अधिक शक्ति मिळो.”