बाबा आणि लेकीचे नाते जगातील सगळ्यात सुंदर नात्यांपैकी एक आहे. जन्मलेल्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतल्यावर प्रत्येक बाबाच्या डोळ्यात नकळत पाणी येते आणि तिथूनच बाबा आणि मुलीच्या अनोख्या प्रवासाची सुरुवात होते. शाळा, कॉलेज, जॉब ते आयुष्यातील जोडीदार निवडेपर्यंत बाबा हा लेकीच्या प्रत्येक निर्णयामागे खंबीरपणे उभा असतो. आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इथे बाबा-लेकीच्या नात्याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे.

धनश्री या तरुणीने तिचा छोटासा प्रवास या व्हिडीओत दाखविला आहे. धनश्रीची परदेशात शिकण्याची इच्छा असते. पण, धनश्रीचे बाबा हे सुरक्षा रक्षक असतात. असे असले तरी धनश्रीच्या बाबांनी मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेतले. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, धनश्रीला यूकेच्या एका प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळाला ही आनंदाची बातमी सांगत ती बाबांना मिठी मारते आणि बाबादेखील तिला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देतात.

हेही वाचा…कमाल! तरुणाने अवघ्या काही सेकंदात रेखाटली रणवीर सिंगची आयकॉनिक पात्रे; VIDEO पाहून अभिनेत्यानेही केलं कौतुक, म्हणाला

व्हिडीओ नक्की बघा :

त्यानंतर धनश्री यूकेसाठी रवाना होताना बाबा एअरपोर्टपर्यंत तिला सोडायला जातात. त्यानंतर व्हिडीओत यूके विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाची झलक दाखविण्यात आली आहे. जिथे बाबांची लेक साडी नेसून काळ्या रंगाचा गाऊन परिधान करून पदवी प्राप्त करण्यासाठी स्टेजवर चालत जाताना दिसते आहे. एकूणच धनश्री तिच्या बाबांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांच्या कष्टामुळे तिचे स्वप्न पूर्ण करते आणि माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल बाबा धन्यवाद, असे आवर्जून सांगताना दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @me_dhanshreeg या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करणतात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ज्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की, तुम्ही सुरक्षा रक्षक आहात. तुम्ही तुमच्या मुलीला परदेशात पाठवू शकत नाही. पण, त्यांना मी सांगू इच्छिते की, ते माझे सुरक्षा रक्षक नाहीत, तर जीवरक्षक आहेत”, अशी कॅप्शन तिने या व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून सुप्रसिद्ध लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. ‘बोटचे संस्थापक अमन गुप्ता यांनी लिहिले, “प्रेरणादायी! देव तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना अधिक शक्ती देवो.” तर बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानानेही हार्ट इमोजीसह व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.