चीन उत्कृष्ट बांधकामासाठी जगभर प्रसिद्ध आहे, तर चीनमध्ये जगातील सगळ्यात मोठी जहाजे उचलण्यासाठी शिपलिफ्ट आहे. तर ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात जगातील सगळ्यात मोठी ही खास शिपलिफ्ट दाखवण्यात आली आहे. या शिपलिफ्टचे नाव गौपिटान शिपलिफ्ट असे आहे. ही शिपलिफ्ट सर्वात वजनदार जहाज अगदी सहज उचलून घेऊ शकते. तसेच याचे बांधकाम आणि वैशिष्ट्ये पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
जगातील सगळ्यात मोठी शिपलिफ्ट चीनमध्ये आहे. गौपीतन शिपलिफ्ट (The Gouptian Shiplift) असे याचे नाव आहे. हे चीनच्या गुइझोउ प्रातांत स्थित आहे. जहाज उचलण्यासाठीची ही लिफ्ट पाहून तुम्ही इंजिनियर्सच्या मेहनतीचे नक्कीच कौतुक कराल. ही शिपलिफ्ट ५०० टन वजनाच्या जहाजांना अगदी सहज उचलून ६५३ फूट उंचीवर उचलू शकते. अशा अनेक उत्कृष्ट बांधकामांसाठी चीन जगभर प्रसिद्ध आहे. पण, ही शिपलिफ्ट त्यापेक्षाही वेगळी आणि अगदीच खास आहे. या खास शिपलिफ्टची झलक एकदा तुम्हीसुद्धा बघाच…
पोस्ट नक्की बघा :
वैशिष्ट्यांनी भरपूर शिपलिफ्ट :
अनेक वैशिष्ट्यांनी भरपूर हे गौपीतन शिपलिफ्ट तयार करणे सोपे नव्हते. प्रगत तंत्रज्ञानामुळे ही शिपलिफ्ट इंजिनियर (Engineer)ना बनवणे शक्य झाले. ही शिपलिफ्ट २०२१ मध्ये बांधून पूर्ण झाली. त्याचे एकूण अंतर २.३ किलोमीटर आहे. गौपीतन शिपलिफ्ट कॉम्प्लेक्सच्या तीन लिफ्टपैकी प्रत्येक लिफ्टची क्षमता १८०० टन आहे आणि या लिफ्टचा वेग आठ मीटर प्रति मिनिट आहे. अनेक खांबांवर स्थित ही शिपलिफ्ट बघायला अगदीच अनोखी आहे.
या लिफ्टचे बांधकाम तुम्ही व्हिडीओत बघू शकता. गुइझोउ (Guizhou) येथील यांग्त्झी (Yangtze) नदीची उपनदी असलेल्या वू नदीवर (Wu River) या गौपीतन शिपलिफ्टचे बांधकाम करण्यात आले आहे. हे जगातील सर्वात आश्चर्यकारक आणि चमत्कारांपैकी एक आहे. चांगजियांग इन्स्टिट्यूट ऑफ सर्व्हेने जहाजे येण्या-जाण्यासाठी गौपिटान शिपलिफ्टला तीन वेगवेगळ्या टप्प्यांत विभागण्याचा निर्णय घेतला. एक जहाज पहिल्या लिफ्टमधून जाताच दुसरे जहाज उचलले जाऊ शकते; तर पहिले जहाज दुसऱ्या आणि तिसऱ्या लिफ्टमधून प्रवास सुरू ठेवते. याआधी ‘सर्वात मोठ्या शिपलिफ्ट’चा विक्रम चीनी थ्री गॉर्जेस हायड्रोपॉवर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अशाच एका यंत्रणेच्या नावावर होता, जो गौपीतन शिपलिफ्टपेक्षा केवळ 14 मीटर लहान आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @Zunair खानदानी @EllyZhang या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.