कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावत असलेलं तौते चक्रीवादळ संथगतीने गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकू लागलं आहे. सध्या हे वादळ मुंबईपासून १२० किमी अंतरावर समुद्रात असून, याचा प्रचंड फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गनंतर रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही सोमवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून, पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये वादळाच्या तडाख्यात सापडणाऱ्या भागांतून तब्बल एक लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे.

दरम्यान एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या वादळात एक सफाई कामगार महिला काम करत आहे. हा व्हिडीओ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून आनंद महिद्रांनी ट्विटरवर रिशेअर केला आहे. आनंद महिद्रांनी व्हिडीओसोबत कॅप्शन देखील लिहले आहे. त्यांनी कॅप्शनमधून बीएमसीला विनंती केली आहे.

आनंद महिद्रां म्हणाले, “या महिलेचे काम प्रेरणादायी आहे. माझी बीएमसीला एक विनंती आहे, की सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोट दिलाच असेल, परंतू पुन्हा एकदा त्यांच्याकडे तो आहे की नाही हे एकदा सुनिश्चित करावे, असे म्हटले आहे.”

Cyclone Tauktae Photos : मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोमवारी पोस्ट केला. त्यासोबत त्याने लिहले आहे की, “त्यांचा सन्मान करा, असे प्रसंग मला किती अधिकार आहेत याची जाणीव वरून देतात”  या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.