seema haidar sachin love story karachi to noida Film audition clip viral: पाकिस्तानातून चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सीमा व सचिन मीणा यांची ऑनलाईन गेम खेळताना ओळख झाली आणि हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांची प्रेमकथा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. सचिन सीमाची प्रेम कहाणी आता लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या प्रेमकहाणीवर चित्रपट बनवण्यात येणार असून या चित्रपटाचे नाव समोर आले आहे. दिग्दर्शक अमित जानी सीमा हैदर आणि सचिन यांच्यावर चित्रपट बनवणार आहेत.

सचिन मीणा सोबतची भारतात राहणारी प्रेमकहाणी, प्रत्येक गल्ली, नाक्यावर प्रसिद्ध झालियं. सीमा हैदर सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिने अनेक वाहिन्यांवर मुलाखती दिल्या. आता हे दोघे ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाच्या ऑडिशन्स देखील सुरू झाल्या आहेत. याच चित्रपटाच्या ऑडिशन्सची सोशल मीडियावर एक क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे.

सीमाचा पात्र मिळविण्यासाठी स्पर्धा

सीमा-सचिनवर बनत असलेल्या चित्रपटाची ऑडिशन क्लिप व्हायरल होत आहे प्रॉडक्शन हाऊसने ऑडिशन क्लिप जारी केली आहे. या क्लिपमध्ये एक मुलगी सचिनशी फोनवर बोलताना दिसत आहे. त्याच्या बाजूला उभा असलेला मुलगा सचिनच्या ऑडिशनसाठी आला आहे. सीमा हैदरच्या भूमिकेसाठी देशभरातील अभिनेत्री आणि मॉडेल्स ऑडिशनसाठी येत आहेत. फोनवर बोलताना दिसणारी मुलगी सीमा हैदर सारखीच आहे, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

(हे ही वाचा : PUBG love Story: भारताwww.loksatta.com/trending/husband-of-a-pakistani-woman-seema-haider-has-appealed-to-the-modi-government-to-send-back-his-children-and-wife-to-pakistan-pdb-95-3778819/त येऊन प्रियकरासोबत थाटला संसार, पाकिस्तानी पतीची मोदींना विनंती; म्हणाला, “पत्नीला…” )

यापूर्वी अशा बातम्या येत होत्या की, सीमा हैदर तिच्या ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, आतापर्यंत सीमा आणि प्रॉडक्शन हाऊसच्या बाजूने काहीही स्पष्टपणे समोर आलेले नाही. होय, सीमा अभिनयात पदार्पण करणार हे नक्की. राजस्थानमधील उदयपूर येथील शिंपी कन्हैया लालच्या हत्येवर चित्रपट बनवला जात आहे. ‘ए टेलर मर्डर स्टोरी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात सीमा हैदर रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचे येत्या आठवड्यात अमित जानी थीम साँग लाँच करणार आहेत, ज्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. गेल्या आठवड्यात जानी फायरफॉक्स प्रोडक्शन हाऊसच्या टीमने ग्रेटर नोएडा गाठून सीमा आणि सचिनची भेट घेतली. सीमाची ऑडिशन होती. मात्र, सीमाने ‘ए टेलर मर्डर स्टोरी’साठी ऑडिशन दिली. ज्यासाठी तिलाही पुष्टी मिळाली आहे. फक्त यूपी एटीएसकडून क्लीन चिटची प्रतीक्षा आहे.