दिल्लीत स्कूटीच्या नंबर प्लेटवरील SEX सीरिजमुळे गदारोळ, तरुणीचं कुटुंब त्रस्त; जाणून घ्या नेमकं काय घडलंय?

दिल्लीच्या आरटीओ अधिकाऱ्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की, या मालिकेतील सुमारे १० हजार वाहनांना क्रमांक देण्यात आले आहेत.

SEX series number plate
दिल्लीतील घटना (फोटो: DailyO)

देशाची राजधानी दिल्लीत आरटीओने दुचाकीला (Scooty) असा क्रमांक जारी केला असून, ज्यामुळे एक कुटुंब नाराज झाले आहे. हे ते कुटुंब आहे ज्यांच्या नवीन स्टकूटरला हा नंबर मिळाला आहे.

वास्तविक, DL3C आणि DL3S सीरीजमधील वाहनांचे क्रमांक दक्षिण दिल्ली आर टी ओ (RTO) द्वारे जारी केले जातात. या सीरीजमध्ये गेल्या महिन्यात DL 3 SEX सीरीजचे नवीन क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र आता ही सीरीज वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे. कारण या मालिकेअंतर्गत जी अक्षरे दिली जात आहेत ती विचित्र आहेत. मालिकेतील अक्षरामुळे DL 3 ‘SEX’…. (सेक्स) सारखे शब्द बनत आहेत.

( हे ही वाचा:व्यक्तीने AK47 ने टेस्ला कारवर झाडल्या गोळ्या; पुढे काय झालं बघा व्हायरल व्हिडीओमध्ये )

स्कूटरचा नंबरमुळे कुटुंब नाराज

याबाबत दिल्लीच्या आरटीओ अधिकाऱ्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की, या मालिकेतील सुमारे १० हजार वाहनांना क्रमांक देण्यात आले आहेत. पण आता एका मुलीला या मालिकेचा नंबर दिल्याने प्रकरण जोर धरत आहे. कारण त्या मुलीच्या स्कूटीला RTO मधून मिळालेला नंबर, S.E.X अक्षरे आहेत.

( हे ही वाचा: पर्यटकांनी भरलेल्या सफारी जीपसोबत सिंहाची रस्सीखेच; व्हिडीओ व्हायरल )

आता मुलीच्या कुटुंबीयांना त्यांच्या स्कूटीचा नंबर बदलायचा आहे. पण प्रश्न असा आहे की हे शक्य आहे का? याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही दिल्लीचे परिवहन आयुक्त के के दहिया यांच्याशी बोललो, ते म्हणाले, ‘वाहनाचा क्रमांक दिला की तो बदलण्याची कोणतीही तरतूद नाही, कारण संपूर्ण प्रक्रिया एका सेट पॅटर्नवर सुरू आहे.

( हे ही वाचा: जेसीबीवरून वधू-वराने घेतली एन्ट्री आणि…, व्हिडीओ बघून तुम्हालाही हसू आवरणार नाही )

असे हे पहिलेच प्रकरण

अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. आत्ताच्या नियमानुसार संख्या बदलत नाही. मात्र जर एखाद्याला त्याच्या वाहनाच्या क्रमांकामुळे अडचण येत असेल, विशेषत: ती मुलगी असेल, तर याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.ही बाब लक्षात घेता परिवहन विभागानेही क्रमांक वाटप करण्यापूर्वी अशा बाबींमध्ये लक्ष घालावे, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही, असे म्हणता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sex series on scootys number plate in delhi find out exactly what happened ttg

ताज्या बातम्या