बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याचा वाढदिवस 2 नोव्हेंबर रोजी होता. या वाढदिवसाला मन्नत बंगल्यावर शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहत्यांची गर्दी जमली होती. तर शाहरुख खानचा वाढदिवस पाण्याच्या बाटली विकणाऱ्या एका वृद्ध व्यापारी महिलेसाठी अगदीच खास ठरला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. व्यापारी महिलेने तिचा अनुभव सांगितला आहे, जो तुमचंही मन नक्कीच जिंकेल.
दोन वर्षांपूर्वी पाण्याची बाटली विकणाऱ्या व्यापारी महिलेला कोणीतरी सांगितले की, शाहरुख खानचा वाढदिवस येतो आहे. त्याच्या मन्नत बंगल्यासमोर पाण्याच्या बाटली विकायला जा, तुझा खर्च निघून जाईल. पहिल्यांदा तिला ही गोष्ट जेव्हा अज्ञात व्यक्ती सांगते, तेव्हा तिला मस्करी वाटते. पण, मग तिने विचार केला की, असे करून बघायला काय हरकत आहे. जेव्हा महिला शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर गेली तेव्हा एवढ्या लोकांना तिथे पाहून तिला वाटलं, जणू काही तिथे जत्राच आहे. प्रत्येकाला फक्त शाहरुख खानला पाहण्याची इच्छा आहे आणि तेव्हा व्यापारी महिलेला समजले की, ही मस्करी नाही आहे. व्हायरल होणारी ही पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
हेही वाचा…रस्ता स्वच्छ करण्यासाठी अनोखा जुगाड! ‘भल्लालदेव’च्या रथासारखी केली गाडीची रचना… Video व्हायरल
पोस्ट नक्की बघा :
अभिनेत्याच्या वाढदिवसाने बदललं महिलेचं नशीब :
पुढे महिलेनं सांगितले की, व्यापारी महिलेचा आजही व्यवसाय तसाच आहे. कधी खर्च निघून जातो तर कधी नाही. पण, तिने शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी एका दिवसात खूप जास्त पैसे कमावले आणि दोन वर्षांपूर्वी महिलेनं ती गर्दी पाहून ठरवलं की, प्रत्येक वर्षी शाहरुख खानच्या वाढदिवसाला मन्नतवर जायचं! हा वर्षातील एक दिवस असतो, जेव्हा व्यापारी महिला निश्चिंतपणे सगळ्यात जास्त पैसे कमावते. व्यापारी महिलेला शाहरुख खान ओळखतदेखील नाही, तरीही त्याच्या वाढदिवसाने महिलेच्या आयुष्यात खूप जास्त फरक पडला आहे. सगळे अगदी खरं बोलतात, “बादशाह तर तो आहे…” अशा रीतीने व्यापारी महिलेने आपल्या भावना मांडल्या आहेत.
सोशल मीडियावर ही पोस्ट @officalhumansofbombay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये महिलेचा एक फोटो आहे, ज्यात ती तिचा व्यापार म्हणजेच पाण्याच्या बाटली विकताना दिसते आहे. यादरम्यान तिचा हा फोटो काढण्यात आला आहे. तसेच अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस व्यापारी महिलेसाठी कसा खास ठरला, हेसुद्धा या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.