Man Kissed Police Viral Video: सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, अलीकडे पोलीस खात्यातील अनेक अधिकारी सुद्धा सोशल मीडियावर डान्स करून, रील बनवून इन्फ्लूएंसर बनत आहेत. अशाच एका पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशातील महिलेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये त्या महिलेचे कृत्य पाहून सुरुवातीला तिचे कौतुक करावेसे वाटू शकते पण नंतर तिचा चांगुलपणा चांगलाच अंगाशी आल्याने हा व्हिडीओ जरा जास्त चर्चेत आहे. नेमकं असं या व्हिडिओमध्ये घडलं काय चला पाहूया…
अनेकदा पोलिसांची प्रतिमा अनेकांच्या मनात फक्त कठोर, शिक्षा करणारे अशीच असते पण पोलिसांची हळवी बाजू अलीकडे सोशल मीडियामुळे समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा एक महिला पोलीस कर्मचारी एका तरुणाला अस्वस्थ पाहून त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. एवढ्यात त्या तरुणाच्या डोक्यात काय येऊन जातं की, तो या महिलेची मान धरून तिला किस करू लागतो. भररस्त्यात या बेभान तरुणाचा धीटपणा पाहून सगळेच थक्क होतात. आता तुम्हाला वाटेल की यामुळे ही महिला खूप रागवेल पण तिची प्रतिक्रिया पाहून तर आपण जास्त शॉक व्हाल.




Video: भररस्त्यात तरुण झाला बेभान, चक्क महिला पोलिसाला किस
हे ही वाचा<< कुस्तीपटूंचे आंदोलन खोटे? साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते? Viral फोटोचं सत्य वाचून डोळे उघडतील
दरम्यान, @Sanscari_ladka या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया येत आहे. काहींनी हा व्हिडीओ बांगलादेशमधील असल्याचे सांगितले आहे. या महिला पोलिसांचा गणवेश पाहूनही असेच वाटत आहे. काहींच्या माहितीनुसार ही तरुणी बांगलादेशी अभिनेत्री असल्याचे म्हटले जाते. अनेकांनी यावर कमेंट करून “चांगुलपणा अंगाशी आला”, “तिथेच कानाखाली मारायला हवी होती”, असे म्हटले आहे.