कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यापासून डिजिटल पद्धतीनं म्हणजे ऑनलाईन मीटिंगमध्ये वाढ झाली आहे. यादरम्यान बहुतेक लोक झूम अॅपचा ऑनलाईन मीटिंगसाठी वापर करतात. मात्र अनेकदा झूम मीटिंगदरम्यानच लोक अशा काही चुका करतात की हा चर्चेचा विषय ठरतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. याची त्याला शिक्षाही मिळाली आहे, उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याला शर्ट न घालता ऑनलाइन मीटिंगला आल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण महासंचालक विजय किरण आनंद यांनी त्वरीत कारवाई केली आणि व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान असा पोशाख घातल्याबद्दल अधिकाऱ्याला निलंबित केले.

शर्ट न घालता ऑनलाइन मीटिंग

मंगळवारी झालेल्या एका आढावा बैठकीत विजय किरण आनंद विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्त अधिकाऱ्यांसोबत विभागीय प्रकल्पांच्या प्रगतीबाबत चर्चा करत असताना ही घटना घडली आहे. या मिटिंगदम्यान उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना या प्रकारामुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या कपड्यांमुळे उपस्थितांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. अधिकारी कोणत्या जिल्ह्यातील होता हे स्पष्ट नाही. मात्र, शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा – १ कोटींचं पॅकेज! फक्त ६ तास काम, मात्र ‘या’ एका अटीमुळे नोकरीसाठी कुणीही होईना तयार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॉलवर उपस्थित असलेले इतर लोक या व्यक्तीला पाहून हैराण होतात. सोशल मीडियावरही याच बैठकिची सध्या चर्चा सुरु आहे. तर अनेकजण यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.