Flyover Tempo Accident Video: कुणालाच विश्वास बसणार नाही असा अपघात. क्षणभरात सर्व काही बदलून गेलं. वरून येणारं एक जड वाहन अचानक संतुलन गमावतं आणि काही सेकंदांतच त्यातील लोखंडी सामान कोसळू लागतं. खाली रस्त्यावरून शांतपणे जाणारा बाईकस्वार या भीषण दुर्घटनेत सापडतो. त्यामध्ये लोकांच्या डोळ्यांसमोर जे दृश्य उभं राहिलं ते इतकं भयानक होतं की, कित्येकांचा श्वास रोखले गेले. त्या क्षणानंतर पुढे नेमकं काय घडलं, ते ऐकल्यावर तुमच्याही अंगावर काटा उभा राहील.

पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या थरारक या अपघातानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. भोसरी येथील छावा चौकाजवळच्या फ्लायओव्हरवर एका टेम्पोचा थरारक अपघात झाला आणि त्यातील लोखंडी सामान थेट खाली रस्त्यावर कोसळलं. दुर्दैवानं ते सामान थेट एका बाईकस्वारावर कोसळलं आणि तो गंभीर जखमी झाला. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. पुढे नेमकं काय झालं, ते ऐकून तुमचंही हृदय धडधडू लागेल…

स्थानिकांच्या माहितीनुसार, टेम्पो प्रचंड वेगात फ्लायओव्हरवरून जात असताना अचानक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. क्षणात टेम्पो उलटला आणि त्यात भरलेलं जड लोखंडी सामान खाली रस्त्यावर आलं. त्याच वेळी खाली रस्त्यावरून बाईकवरून जात असलेला युवक या भीषण दुर्घटनेत सापडला. ते सामान त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर कोसळल्यानं, तो गंभीर जखमी झाला.

अपघात होताच परिसरात एकच आरडाओरड झाली. नागरिकांनी धाव घेत जखमी युवकाला तातडीन जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, त्या घटनेनंतर रस्त्यावर गोंधळ होऊन, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने उलटलेला टेम्पो हटवण्यात आला, तर रस्त्यावर पसरलेलं लोखंडी सामानही बाजूला करण्यात आलं. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तासाभराहून अधिक कसरत करावी लागली.

दरम्यान, टेम्पोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात चालकाने बेपर्वाईने, वेगात टेम्पो चालवल्याचं उघड झालं आहे. अपघाताच्या ठिकाणी मोठा अनर्थ टळला; मात्र लोखंडी सामान थेट बाईकस्वारावर कोसळल्यामुळे परिसरात त्या अपघातामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

स्थानिक नागरिकांनी यावर संताप व्यक्त करीत, “या फ्लायओव्हरवरून दररोज जड वाहनं प्रचंड वेगात धावत असतात, त्यामुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो,” अशी तक्रार केली आहे. त्यांनी अशा बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करून, भारी वाहनांवर निर्बंध घालण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

येथे पाहा व्हिडीओ

या अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक थरारून गेले असून, सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा रंगत आहे.